बल उपासना ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:40 PM2018-02-21T23:40:12+5:302018-02-21T23:40:43+5:30

मल्लखांबसारखे मर्दानी खेळाचे आकर्षण, व्यायाम शाळांचे जाळे आणि बलाची उपासना करण्याची संताची शिकवण, यामुळे महाराष्ट्राच्या मातीतच व्यायामाची संस्कृती रुजली आहे, असे गौरवोद्गार योगगुरु रामदेवबाबा यांनी बुधवारी काढले.

Force worship is the tradition of soil of Maharashtra | बल उपासना ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा

बल उपासना ही महाराष्ट्राच्या मातीची परंपरा

Next
ठळक मुद्देरामदेवबाबा : जिल्हाभरात योगसाधनेचे पसरले चैतन्य

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर/मूल : मल्लखांबसारखे मर्दानी खेळाचे आकर्षण, व्यायाम शाळांचे जाळे आणि बलाची उपासना करण्याची संताची शिकवण, यामुळे महाराष्ट्राच्या मातीतच व्यायामाची संस्कृती रुजली आहे, असे गौरवोद्गार योगगुरु रामदेवबाबा यांनी बुधवारी काढले.
मूल शहरात मंगळवारपासून सुरु झालेल्या योगाशिबिराला दुसºया दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध भागातील हजारो नागरिकांनी येथे येऊन योगासने केली.
मूलमधील या शिबिरामुळे सध्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये योगसाधनेचे चैतन्य संचारले आहे. योग शिबिरासाठी बाहेर जिल्ह्यातून अनेक नागरिक मूल येथे आले असून दररोज सकाळी योगस्थळी उपस्थित राहत आहेत.
योग शिक्षण देतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी आयुर्वेद आणि व्यायामाच्या अनेक अंगावर प्रकाश टाकला व सतत दोन तास त्यांनी प्रात्यक्षिक करताना आपल्या प्राचीन योग कलेची महती आणि आरोग्य जपण्यासाठी पूर्वज करीत असलेल्या उपाययोजना याबाबत प्रबोधन केले.
योग साधनेच्या उत्तरार्धात चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब विद्येचे चित्तथराक प्रात्याक्षिक केले. मल्लखांबपटूचा रामदेवबाबांनी सत्कार केला. समर्थ रामदास स्वामी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अन्य अनेक थोर संतानीच राज्यामध्ये बलाची उपासना करण्याचे मार्गदर्शन अनेक वर्षांपासून केले आहे. महाराष्ट्र हा मर्दानी खेळाला आपल्या मातीत घेऊन वाढला आहे, असेही रामदेवबाबा म्हणाले. महाराष्ट्रामध्ये खेळाला, व्यायामाला गावागावामध्ये प्राधान्य दिले जाते. त्यामुळे योग शिबिरांना या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळतो. महाराष्ट्रातून योग प्रशिक्षक मोठया प्रमाणात तयार झाले असल्याचे ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवारांसह रामदास तडसही शिबिरार्थी
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत वर्धाचे खासदार आणि सुप्रसिध्द कुस्तीपटु खासदार रामदास तडस हेसुध्दा बुधवारी पहाटे ५ वाजतापासून योग शिबिरात शिबिरार्थी म्हणून उपस्थित होते. ते नियतिम योगाभ्यास करतात. यावेळी खा. तडस यांनी आपल्याला काही वषापूर्वी झालेल्या त्रासाबदल आणि रामदेवबाबा यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. शरीर स्वास्थासाठी खा. तडस यांनी हरिद्वार येथे जाऊन रामदेवबाबा यांच्याकडून योग-उपचार केले होते. त्यावेळी रामदेवबाबा यांच्या योगसाधनेच्या माध्यमातून विविध आजारातून बाहेर पडलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. यामध्ये देशभरातील शिबिरार्थ्यांचे अनुभव ऐकता आल्याची आठवणही खा. तडस यांनी यावेळी काढली.

वरोºयात आज कृषीप्रदर्शन
योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत गुरुवार दि. २२ फेब्रुवारीला वरोरा येथील आनंदवन चौक परिसरात जिल्हास्तरीय कृषी मेळावा आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता या कृषी मेळावा व प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर राहतील. जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे या मेळाव्याच्या स्वागताध्यक्ष आहेत.

चांगली गोष्ट पाहण्याची सवय करा
नेहमी चांगली गोष्ट पाहण्याची सवय करा, ऐकण्याची सवय करा, यामुळे विचार करण्याच्या क्षमतेत वाढ होते. उलट विचार मनात आले तर ते विचार तेथेच थांबवा. प्रत्येकांच्या मनात बालपणापासूनच संस्कार रूजविले जाते. तुम्ही जे संस्कार बालकांमध्ये कराल, तेच संस्कार बालकाच्या मनात रूजेल. त्यामुळे बालकांच्या मनात चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करा, रोज संपूर्ण आसने करा, परंतु वेळेअभावी करीत नसाल तर वेळ काढून कपालभांती आणि अनुलोम विलोम ही दोन आसने नियमित कराच. या आसनामुळे लकवा, थाईरॉईड यासह विविध आजार बरे होत असल्याचेही रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितले.
आग्रा येथील युवकही सहभागी
या शिबिरात आग्रा येथील एक २१ वर्षीय युवकही सहभागी झाला आहे. सदर युवकाला हदयविकाराचा आजार झाला होता. त्याला वैद्यकीय अधिकाºयांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. परंतु त्याने शस्त्रक्रिया न करता पतंजली उत्पादीत रसांचे सेवन केल्याने बरा झाल्याचे त्याने यावेळी सांगितले.

Web Title: Force worship is the tradition of soil of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.