जबरानजोतधारकांचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:26 PM2019-06-17T23:26:48+5:302019-06-17T23:27:03+5:30
अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंंद्रपूर : अनुसुचित जाती व इतर पांरपरिक वनवासी वनहक्क कायद्यातंर्गत शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे आणि विविध प्रलंबित समस्या तातडीने सोडवावे, या मागणीकरिता उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात जबरानजोतधारक शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ च्या कायद्यातंर्गत जिल्ह्याल शेतकºयांना जमिनीचे पट्टे द्यावे, कसत असलेल्या वनजमिनीवरचा कब्जा हटविण्यासाठी शेतकºयांवर दबाव टाकणाºयांना अधिकाºयांना आळा घालावा, शेतीचा पुरावा सिद्ध करण्यासाठी तिन पिढ्यांची अट रद्द करावी, आदिवासी विकास मंत्रालयाने १ जानेवारी २००८ रोजी जारी केलेल्या अधिसुचनेच्या कलम १३ (१) (झ) अनुसार मागणीदार खेरीज अन्य वडीलधाºया व्यक्तीचे लेखानिविष्ट कथन हा पुरावा ग्राह्य धरावा आणि शेतीचे पट्टे द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांना दिले.
यावेळी विठ्ठल लोनबले, गजानन आयलनावार, सविता वाटगुरे, दर्शना वाळके, सुलोचना कोवे,रूपेश निमसरकार,प्रशांत उराडे आदी उपस्थित होते. हा मोर्चा शहरातील महात्मा गांधी चौकातून निघाला.