जबरानजोत शेतकऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:20 PM2018-03-27T23:20:00+5:302018-03-27T23:20:00+5:30
जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा आम आदमी पार्टी व बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा विधानसभेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जबरानजोत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा आम आदमी पार्टी व बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा विधानसभेतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वन महसूल जागेवर अतिक्रमण करून मागील ५० वर्षापासू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचे मालकी हक्क मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना त्वरीत मालकी हक्क देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
आम आदमी पक्षाचे सुनील भोयर यांच्या नेतत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी नेते रंगा राचुरे, चंद्रकांत वानखेडे, देवेंद्र वानखेंडे, जंगजित सिंग, मनोहर पवार, योगेश आपटे, सुनील मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वामीनाथन आयोग लागू करा, जबरानजोत शेतकऱ्यांसाठी ग्रामसभेतील उपस्थितांच्या स्वाक्षरीची अट रद्द करा, तूर व चनाला हमी भाव द्यावा आदी मागणांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यांना देण्यात आले. यावेळी असंख्य शेतकºयांची उपस्थिती होती.