विदेशी पाहुण्यांनी जाणून घेतली बांबू कलेची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 09:53 PM2018-11-17T21:53:46+5:302018-11-17T21:54:04+5:30

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कल्पनेतील इच्छेला मूर्त रूप मिळून चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची इमारत ही जागतिक दर्जाची असून बांबू व मातीपासून बनविली जाणारी आशिया खंडातील एक आगळीवेगळी अशी पर्यावरणपूरक वास्तू आहे.

Foreign visitors know the importance of Bamboo art | विदेशी पाहुण्यांनी जाणून घेतली बांबू कलेची महती

विदेशी पाहुण्यांनी जाणून घेतली बांबू कलेची महती

Next
ठळक मुद्देकेंद्राच्या इमारतीची पाहणी : चिचपल्ली येथील बांबू संशोधन केंद्राला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कल्पनेतील इच्छेला मूर्त रूप मिळून चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची इमारत ही जागतिक दर्जाची असून बांबू व मातीपासून बनविली जाणारी आशिया खंडातील एक आगळीवेगळी अशी पर्यावरणपूरक वास्तू आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा सिंगापूर येथील एका मॅग्झीनमध्ये विशेष उल्लेख केला होता. ते वाचून व इमारतीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी चक्क विदेशातील आर्कीटेक चंद्रपुरात आले. त्यांनी या बांबू कलेची महती जाणून घेतली.
या दर्जेदार बांबू हस्तकलेबद्दल ऐकून व प्रेरित होवून मूळचे मोझाम्बिक या देशाचे असलेले मिशेल ओलोफ्सन हे एक आर्किटेक असून प्रोजेक्ट विटा या संस्थचे ते संस्थापक आहेत. त्यांची संस्था स्वीडन व मोझाम्बिक या देशात कार्यरत आहे.
मिशेल ओलोफ्सनसोबत ऐश्वर्या शेंद्रे व त्याचे सहकारी व्यंकट हे दोघेही भारतीय आर्किटेक असून प्रोजेक्ट विटा या संस्थेचाच एक भाग म्हणून ते दोघेही त्यांचासोबत चिचपल्ली येथे आले होते.
त्यांनासुध्दा बांधकामाच्या कलेमध्ये आवड व छंद असल्याने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, स्थित चंद्रपूर येथे चालू असलेल्या दर्जेदार बांबू कामाची दखल घेवून प्रस्तुत केंद्रास भेट देवून कामाची जातीने पाहाणी केली व बांबूपासून तयार होत असलेल्या वस्तूंची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सदरची वास्तू पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी चालू वास्तूकलेच्या कामाचे चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर वन अकादमी परिसरात असलेल्या बांबू कार्यशाळेला भेट देवून बांबूपासून तयार करण्यात येणााऱ्या कलात्मक वस्तूचे निरीक्षण केले. या ठिकाणी तयार झालेल्या नावाच्या पाट्या, राष्ट्रीय झेंडे, बांबूची सायकल, रोजनिशी, सोफासेट, मोमेंटो इत्यादी वस्तूची पाहणी करून चित्रीकरण केले व बांबू कारागीरांशी व कर्मचाºयांशी संवाद साधला.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत सुरू असलेल्या वेगवेगळया कोर्सेसची व योजनांची विस्तृत माहिती त्यांना देण्यात आली.
यावेळी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील, यांना त्यांच्या कार्यालयात भेटून वेगवेगळ्या कोर्सेस बद्दल प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर येथे चालू असलेल्या दर्जेदार कामाने प्रेरित होवून त्यांनी स्वीडन देशातील विद्यार्थी हे बांबू प्रशिक्षणासाठी भारतात शिकायंला येऊ शकतात काय किंवा या संस्थेतले बांबू ट्रेनर त्यांच्या देशात जावून त्या ठिकाणी बांबूचे प्रशिक्षण देवू शकतात. या शक्यतांबाबत चर्चा करण्यात आली.
बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्लीच्या माध्यमातून गरजू, बांबूकामाची आवड असलेल्या बुरड व इतर समाजातील युवक आणि युवतींना बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचे ७० दिवसीय प्रशिक्षण देवून स्वयंरोजगाराची निर्मिती केली जाते, हे येथे उल्लेखनीय.

Web Title: Foreign visitors know the importance of Bamboo art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.