वृक्ष लागवडीसाठी वन विभागाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:30+5:302020-12-25T04:23:30+5:30
चंद्रपूर : वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने नियोजन केले आहे. वन परिक्षेत्रात बैठका घेवून उद्दिष्टपूर्तीचे ...
चंद्रपूर : वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाने नियोजन केले आहे. वन परिक्षेत्रात बैठका घेवून उद्दिष्टपूर्तीचे नियोजन करणे सुरू आहे. यावर्षी ७९़७९ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले. यामध्ये २७़५० लाख उद्दिष्ट एकट्या वनविभागाचे आहे.
अनुदान रखडल्याने
शेतकºयांची कोंडी
वरोरा : तालुक्यात धडक सिंचन विहिर योजनेची कामे करण्यात आली. विहिर खोदकाम केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश देण्याचे आदेश आहेत. मात्र मंजूर झालेल्या विहिरींचे खोदकाम करूनही अनुदान मिळत नसल्याने अनेकांच्या विहिरींचे बांधकाम रखडले आहे. खरीप हंगामातही अनुदान न मिळाल्याने शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली आहे.
बियाण्यांचा पुरवठा
करण्याची मागणी
्न्न्नराजुरा : तालुक्यात रब्बी हंगामात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातही हाच प्रकार घडत असल्याने शेती तोट्यात जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे महाबीज व कृषी विभागाने दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
रिक्त पदांमुळे विविध
योजना कागदावरच
सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना पशुपालक शेतकºयांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समितीस्तरावर सुधारीत आकृती बंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण, पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे योजना कागदावरच राहिल्या, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.
विशेष घटक योजनेतून
वीज जोडणी करावी
घुग्घुस : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.
तालुक्यातील नाल्यांची
स्वच्छता करावी
राजुरा : तालुक्यातील अनेक गावांतील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. काही वॉर्डांत नाल्या बांधण्यात आल्या. पण, नियमित स्वच्छता होत नसल्याने बºयाच ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे दिसून येत आहे.
दीड लाखांचादारुसाठा जप्त
चंद्रपूर: पोलिसांनी चार दिवसात विविध ठिकाणी धाड टाकून दीड लाखांचा दारुसाठा जप्त केला. यावेळी १४ गुन्ह्यांची नोंद करुन पाच जणांना अटक केली. ही कारवाई चंद्रपूर शहर, दुर्गापूर, घुग्घुस, वरोरा, शेगाव, चिमूर, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, मूल येथील पोलिसांनी केली.
रस्त्यावर वाहन ठेवणाºया दोघांवर कारवाई
चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाºया दोन वाहनचालकांवर गुरूवारी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई रामनगर व बल्लारपूर पोलिसांनी केली. वाहनचालकांवर कलम भांदवि २८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्यात सहा मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलिसांनी मद्यपी वाहनाचालकांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार मंगळवारी सहा मद्यपींवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चंद्रपूर शहर पोलिसांनी दोन, तर नागभीड, सावली, व गोंडपिपरी पोलिसांनी प्रत्येकी एक वाहनचालकांवर कारवाई केली.
जिल्ह्यात नऊ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विविध प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये कलम १०७ दंड प्रक्रिया अन्वये सहा, कलम १२२ मुंबई पोलीस कायदा अन्वये दोन, कलम ११०/११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये एक, असे एकूण नऊ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.
मोटार वाहन कायद्यान्वये १९४ जणांवर कारवाया
चंद्रपूर : दिवसेंदिवस वाढणाºया अपघाताच्या संख्येवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई सुरु केली आहे. रिफलेक्टर/नोपार्किंग ११, दारुप्राशन पाच व इतर १७८ अशा एकूण १९४ कारवाया आठवडाभरात झाल्या आहेत.
पेठगाव रस्त्यावर
खड्ड्यांचे साम्राज्य
सावली : तालुक्यातील उपरी ते भान्सी-पेठगाव रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ये-जा करणाºयांना त्रास सहन करावा लागत आहे.
जांभूळघाट-नवतळा
मार्गाची दुरवस्था
चिमूर : तालुक्यातील जांभूळघाट-पिंपळगाव-नवतळा हे आठ कि.मी चे अंतर आहे. चार वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडले. बांधकाम विभागाने तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.