अन् कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद

By राजेश भोजेकर | Published: September 14, 2022 04:40 PM2022-09-14T16:40:45+5:302022-09-14T16:49:15+5:30

भद्रावती शहरातील खापरी वार्डातील घटना

forest department rescued a leopard who stuck in chicken coop | अन् कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद

अन् कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद

googlenewsNext

भद्रावती(चंद्रपूर) :  शहरातील खापरी वार्ड येथील साई नगर येथे निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरी असलेल्या पाळीव कोंबड्यांच्या कोठोड्यात (बेंड्यात) पहाटे साडे ४ वाजताच्या सुमारास अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केल्याने तो अखेर तो तेथे अडकला. त्यामुळे त्या परिसरात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान बिबट्याने खुराड्यात असलेल्या काही कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले.

घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाची चमू, इको - प्रो, सार्ड, आरआरआर व आरआरटीच्या चमूने दाखल होऊन सकाळी ५ ते साडे १० दरम्यान रेस्क्यु टीम ऑपरेशन राबवून बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. वैद्यकीय तपासणी करून त्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले.

सदर बिबट हा अडीच वर्षीय असून त्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक वन संरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे  इको-प्रोचे बंडू धोतरे व त्यांची चमू, सार्डचे अनुप येरणे व त्यांची चमू, आरआरआर व आरआरटी या टीमने रिस्क्यू ऑपरेशन मोहीम राबवून तब्बल साडे ५ तासानंतर बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद केले. पशू वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी अहवालानंतर बिबट्या निसर्गमुक्त करण्यात आले. 

Web Title: forest department rescued a leopard who stuck in chicken coop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.