वनविभागाचे कार्य उत्तमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:15 PM2018-02-14T23:15:08+5:302018-02-14T23:15:37+5:30

निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे.

Forest department works best | वनविभागाचे कार्य उत्तमच

वनविभागाचे कार्य उत्तमच

Next
ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : उथळपेठ येथे निसर्ग पर्यटन क्षेत्राचे लोकार्पण

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : निसर्गाने ज्या परिसराला भरभरून दिले आहे, त्याचे सौंदर्य अधिक वाढवत ते स्थळ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी नवनवीन संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहे. इको पार्क ही त्यातील एक प्रमुख संकल्पना आहे. पर्यावरण संवर्धन, निसर्ग संवर्धनासाठी ते सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या विविध लोकहितकारी निर्णयामुळे दुर्लक्षित समजला जाणारा वनविभाग आता मुख्य प्रवाहात आला असून विभागाचे काम उत्तम आहे. लोकांच्या हृदयात विशेष स्थान वनविभागाने निर्माण केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.
मूल तालुक्यातील उथळपेठ येथील श्री गायमुख देवस्थान या निसर्ग पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या इको पार्कच्या लोकार्पण सोहळयात चंदनसिंह चंदेल बोलत होते. ते पुढे म्हणाले, चंद्रपुरात बायपास मार्गावर वनविकास महामंडळाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम निसर्ग उद्यान ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जनतेच्या सेवेत रूजु झाले असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मूल शहरात पंडीत दीनदयाल उपाध्याय इको पार्क, पोंभुर्णा शहरात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क तयार करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी येथेसुध्दा त्यांच्या पुढाकाराने इको पार्कच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. या माध्यमातून निसर्ग पर्यटनाला त्यांनी चालना दिली आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून उथळपेठ गायमुख देवस्थान परिसरात तयार करण्यात आलेल्या इको पार्कमुळे या परिसराच्या वैभवात आणखी भर घातली जाणार असल्याचे चंदनसिंह चंदेल म्हणाले.
यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्?थानी होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, जि.प. सदस्य पृथ्वीराज अवताळे, मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, उथळपेठचे सरपंच रवंीद्र सातपुते आदींची उपस्थिती होती.
परिसर झाला देखणा
उथळपेठ येथील गायमुख देवस्थान पाण्याच्या कुंडाचे सौदर्यीकरण, गाय, बैल आदी प्राण्यांच्या तसेच गुराखी यांच्या प्रतिमा, विविध प्रजातींची लावण्यात आलेली रोपे, मुलांसाठी तयार करण्यात आलेले पार्क आदींच्या माध्यमातून हा परिसर अधिक देखणा करण्यात आलेला आहे.

Web Title: Forest department works best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.