वन पर्यटनाला चालना मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:06 AM2018-01-07T00:06:31+5:302018-01-07T00:07:14+5:30
पर्यटन व वन विभागाच्या वतीने निसर्गरम्य क्षेत्रांचा विकास करण्यासाठी धोरण तयार केले.
आवाळपूर : पर्यटन व वन विभागाच्या वतीने निसर्गरम्य क्षेत्रांचा विकास करण्यासाठी धोरण तयार केले. कोरपना तालुक्यातही या योजनांचा लाभ मिळणार असून वन पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत आमदार अॅड. संजय धोटे यांनी व्यक्त केले. अमलनाला सौंदर्यीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी गडचांदूरच्या नगराध्यक्ष भाग्यलक्ष्मी डोहे, महादेव एकरे, निलेश ताजने, आबिद अली, गोपाल मालपाणी, महादेव जयस्वाल, हितेश चव्हाण अनंता चटप, पापया पुनमवार, हरीश घोरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनवने व परिसरातील सरपंच उपस्थित होते.
आ. धोटे म्हणाले, कोरपना तालुक्यातील गोंडकालिन माणिकगड किल्ला जिल्ह्याचे वैभव आहे. अमलनाला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या निर्सग पर्यटन क्षेत्राचा विकास झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पकड्डीगडम व जगुंदेवी पर्यटन क्षेत्राचा विकासाच्यासाठी प्रयत्न केले जात आहे, असेही आ. धोटे यांनी यावेळी सांगितले. उपवनसंरक्षक हिरे म्हणाले, अमलनाला पर्यटन स्थळाच्या विकास कामासाठी १० कोटींचा प्रकल्प आराखडा तयार आहे. विहित कालावधीतच सर्व विकासकामे पूर्ण केले जाणार आहे. या कामांमध्ये लोकसहभागाची गरज आहे. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.