विसापूर,नांदगाव, हडस्तीमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:12+5:302020-12-26T04:23:12+5:30

विसापूर: बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर त्यापाठोपाठ नांदगाव (पोडे), हडस्ती या क्षेत्रांमधील ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी इच्छुकांनी ...

Formation of aspirants in Visapur, Nandgaon, Hadasti | विसापूर,नांदगाव, हडस्तीमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

विसापूर,नांदगाव, हडस्तीमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी

Next

विसापूर: बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर त्यापाठोपाठ नांदगाव (पोडे), हडस्ती या क्षेत्रांमधील ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीसाठी इच्छुकांनी राजकीय पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दरम्यान, या गावातील वातावरण चांगलेच तापले असून राजकीय नेते कामाला लागले आहे. तर शेतकरी, शेतमजूर आपल्या कामात गुंग आहे.

विसापूर ग्रामपंचायतीमध्ये ६ प्रभागामधून १७ सदस्य निवडले जाणार आहे. येथील मतदारांची संख्या ८ हजार २०६ असून ४ हजार २०४ पुरुष तर ४ हजार २ महिला मतदार आहे. ११ मतदार केंद्राच्या माध्यमातून उमेदवार निवडण्यात येणार आहे. नांदगाव (पोडे) ग्रामपंचायतमध्ये ४ प्रभाग असून ११ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण २ हजार ८५५ मतदारांपैकी १ हजार ४९६ पुरुष व१ हजार ३५९ महिला मतदार चार मतदान केंद्राच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडणार आहे. हडस्ती- चारवट ग्रामपंचायत मिळून ३ प्रभाग आहे. यामध्ये ७ सदस्य निवडले जाणार आहे. येथील मतदार संख्या ७७२ असून ४०९ पुरुष ३६३ महिला मतदार आहे. ३ मतदान केंद्राच्या सहाय्याने उमेदवार निवडायचे आहे.

यावर्षी बिनविरोध उमेदवार निवडून देण्याचा मानस येथील मतदारांनी व्यक्त केला आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख जसजशी जवळ येत आहे. तसतसे इच्छुकांमध्ये आवेदन पत्र भरण्याची लगबग वाढली आहे. परंतु आरक्षित जागेवरून लढणाऱ्या उमेदवारांना जात पडताळणी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी चांगला दमछाक सुरु आहे.

Web Title: Formation of aspirants in Visapur, Nandgaon, Hadasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.