आजी-माजी आमदारांची पाण्यासाठी धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:44 PM2017-08-26T23:44:05+5:302017-08-26T23:44:24+5:30
गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकºयांना उपलब्ध व्हावे, यासाठी आ. विजय वडेट्टीवार व माजी आ. प्रा. अतुल देशकर यांनी गराडी नाल्याकडे धाव घेवून गोसेखुर्दचे पाणी ....
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : गोसेखुर्द धरणाचे पाणी शेतकºयांना उपलब्ध व्हावे, यासाठी आ. विजय वडेट्टीवार व माजी आ. प्रा. अतुल देशकर यांनी गराडी नाल्याकडे धाव घेवून गोसेखुर्दचे पाणी शेतकºयांना उपलब्ध करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या. त्यानुसार पाणी सोडण्यात आले असून शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरण शेतकºयांसाठी वरदान ठरणारे आहे. परंतु, काम अपूर्ण असल्याने पाणी सोडणे बंद आहे. विशेषत: गराडी नाल्याजवळ कालवा खचल्याने त्याचे काम सुरू होते. परंतु, ब्रह्मपुरी तालुक्यात अत्यल्प पावसामुळे परिसरातील शेतकºयांची रोवणी शिल्लक आहेत. तर रोवणी व आवत्या झालेले पीक पाण्याअभावी करपायला सुरुवात झाली आहे. शेतकºयांना गोसेखुर्द धरणाचे पाणी यापूर्वी शेतीला मिळाले असते, तर शेतकºयांची पूर्णत: रोवणी झाली असती. मात्र दुधवाहीजवळ गराडी नाल्यावर पूल व धरण खचल्याने गेल्या वर्षभरापासून पाणी सोडणे बंद केले होते. ही बाब आजीृ-माजी आमदारांच्या लक्षात आली. दरम्यान आमदार वडेट्टीवार यांनी गोसेखुर्दचे पाणी सोडण्याविषयी ३० आॅगष्टपर्यंत संबंधित विभागाला अल्टीमेटम् दिला होता. तर माजी आमदार देशकर यांनी संबंधित विभागाला काम पूर्ण करून पाणी सोडण्याविषयी बाध्य केले. या साºया प्रकारानंतर गुरुवारी गराडी नाल्यावरुन पुढे आसोलामेंढा तलावापर्यंत पाणी सोडण्यात आले. व परिसरातील शेतकºयांसाठी आजी-माजी आमदारांनी आपआपल्या परीने काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे संबंधित विभागाने गुरुवारी पाणी सोडण्याविषयी सूचना करताच दोन्ही आजी-माजी आमदारांनी आळीपाळीने कार्यकर्त्यासह गराडी नाल्यावर जावून पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी सुरुवातीला माजी आमदार प्रा. अतुल देशकर, नानाजी तूपट, पं.स. सदस्य रामलाल दोनाडकर, पं.स. उपसभापती विलास उरकुडे, राजेश्वर मगरे, राहुल बारसागडे व त्यानंतर आ. विजय वडेट्टीवार, तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, जि.प. सदस्य राजेश कांबळे, जि.प. सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, वैशाली शेरकी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, रश्मी पेशने, प्रतिभा फुलझेले, बाळू राऊत, विलास निखार, डॉ. सतीश कावळे अधिकारी व अभियंता उपस्थित होते.