बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:20+5:302021-07-15T04:20:20+5:30
बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट ...
बल्लारपूर : लोकांचे बाहेर फिरणे बंद झाले होते. यामुळे येथील गणपती घाट तसेच ऐतिहासिक किल्ल्यावर फिरायला जाणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र, परिस्थिती परत सामान्य होऊ लागल्यापासून किल्ला तसेच गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढू लागली आहे.
बल्लारपुरात लोकांना फिरण्याकरिता, तद्वतच बाहेरून आलेल्या पाहुण्यांना शहरात फिरावयास नेण्याकरिता वर्धा नदी काठावरील सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधलेला ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या जवळचे नदी तिरावरचा निसर्गरम्य आणि नयनरम्य गणपती घाट ही महत्त्वाची पिकनिक सहलस्थळे आहेत. गणपती घाटावर बसण्याची व मनमोकळे फिरण्याची उत्तम सोय त्याचप्रमाणे व्यायामाकरिता साधने आहेत. येथील विमानतळासारखे भव्य आणि प्रेक्षणीय बसस्थानक, मोठे लाकूड हेही दर्शनीय तसेच पाहुण्यांना नेऊन दाखवण्याचे स्थळ आहे. मात्र, अधिक वर्दळ ऐतिहासिक किल्ला आणि गणपती घाटावर बघायला मिळते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर या दोन्ही जागांवर लोकांची वर्दळ पूर्वीसारखी वाढली आहे. मात्र, गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे व प्रतिबंधात्मक इतर नियम पाळणे आवश्यक असतानाही या नियमांकडे पाठ फिरविली जात आहे.
140721\img-20210714-wa0009.jpg
बल्लारपूरातील किल्ला व गणपती घाटावर लोकांची वर्दळ वाढली