किल्ला पर्यटनाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 10:24 PM2019-03-02T22:24:44+5:302019-03-02T22:24:58+5:30
१ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : १ मार्च २०१७ रोजी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली होती. या श्रमदानाला ६५० दिवस पूर्ण झाले. अभियानात सहभागी स्वयंसेवक ऐतिहासिक वैभव लक्षात घेऊन योगदान देत आहेत. किल्ला स्वच्छतेमुळे पर्यटक भेट देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच पांढरकवडा येथील दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते. ‘मन की बात’ मधूनही उपक्रमाची दखल घेतली. इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ऊ न, वारा, पाऊ स थंडीची तमा न बाळगता रोज नियमित ६ ते ९ वाजेपर्यंत श्रमदान करून किल्ल्याची स्वच्छ करत आहेत.
श्रमदानामधून मागील दोन वर्षात गोंडकालीन इतिहास, ऐतिहासिक वास्तुंची स्वच्छता झाली. इतिहास नव्याने समोर आला. चंद्रपूरकर हेरिटेज वॉक या इको-प्रोच्या उपक्रमातून शहरातील नागरिक ऐतिहासिक वास्तु पर्यटनाचा आनंद घेत आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ऐतिहासिक वारसा संवर्धनासाठी राष्टÑीय स्तरावर संदेश देता यावा, याकरिता शहरातील ऐतिहासिक ११ किमी लांब असलेला किल्ला व परकोट स्वच्छता अभियान सुरू केले. अभियानाला यशस्वी करण्यासाठी शहरातील विविध संस्था-व्यक्तींनी आवश्यक साहित्य पुरविले. किल्ला स्वच्छता अभियानामधील इको-प्रो सहकारी व श्रमदानाकरिता सहभागी झालेले महाविद्यालयीन विद्यार्थी, शहरातील नागरिक, युवक यांचेही सहकार्य लाभले. अभियानाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केल्याने हे काम पूर्ण होऊ शकले, अशी माहिती इको- प्रो संस्थाचे यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली. किल्ला स्वच्छता अभियानामून दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूकडे पुरातत्व विभागाने लक्ष वेधण्यात इको-प्रोला यश प्राप्त झाले. आतापर्यंत शहरातील अनेक किल्ल्यांची स्वच्छता करण्यात आली सध्या रामाळा तलावाला लागून असलेली किल्ला भिंत आणि त्यामधून उगवलेली झाडेझुडपे काढण्याचे कठीण काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यास शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे.