बल्‍लारपूर, मूल, पोंभुर्णा भागासाठी चार रुग्‍णवाहिका उपलब्‍ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:54+5:302021-04-22T04:28:54+5:30

चंद्रपूर : विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतून बल्‍लारपूर, ...

Four ambulances will be available for Ballarpur, Mul and Pombhurna areas | बल्‍लारपूर, मूल, पोंभुर्णा भागासाठी चार रुग्‍णवाहिका उपलब्‍ध होणार

बल्‍लारपूर, मूल, पोंभुर्णा भागासाठी चार रुग्‍णवाहिका उपलब्‍ध होणार

Next

चंद्रपूर : विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने त्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीतून बल्‍लारपूर, मूल आणि पोंभुर्णा येथील शहरी व ग्रामीण भागासाठी चार रुग्‍णवाहिका लवकरच उपलब्‍ध होणार आहे.

चंद्रपूर जिल्‍ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्‍णसंख्‍येत मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्‍णवाहिकेअभावी रुग्‍णांचे हाल होत आहेत. त्‍यामुळे यासंदर्भात उपाययोजना म्‍हणून आ. सुधीर मुनगंटीवारांनी पुढाकार घेत चार रुग्‍णवाहिका आमदार निधीतून उपलब्‍ध करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या या पुढाकारामुळे मूल, बल्‍लारपूर आणि पोंभुर्णा या भागातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

गेल्‍या वर्षभरापूर्वी उदभवलेल्‍या कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेपासून लॉकडाउनच्‍या कालावधीत आ. सुधीर मुनगंटीवारांनी भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातून गोरगरीब नागरिकांसाठी फुड पॅकेटचे वितरण, सॅनिटायझर, मास्‍कचे वितरण, पोस्‍टमन व पोलीस बांधवांसाठी सुरक्षा किटचे वितरण, रुग्‍णांना ने-आण करण्‍याकरिता रुग्‍णवाहिकेची सोय, सार्वजनिक ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे वितरण, गोरगरिबांना जीवनावश्‍यक वस्‍तू तसेच अन्‍नधान्‍याच्‍या किटचे वितरण, मजुरांना स्‍वगावी पोहचविण्‍यासाठी बसेसची सोय आदी माध्‍यमातून सेवाकार्य केले. आता आमदार निधीतून रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करत नागरिकांना आरोग्‍य सेवा पुरविण्‍याचा त्‍यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Web Title: Four ambulances will be available for Ballarpur, Mul and Pombhurna areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.