आॅटोरिक्षा चालकांना साडेचार लाखात घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:23 PM2018-12-28T22:23:52+5:302018-12-28T22:24:06+5:30
चंद्रपुरातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रुपये साडेचार लाख एवढया किमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने २८ डिसेंबर २०१८ रोजी म्हाडाला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आॅटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्वास आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे रुपये साडेचार लाख एवढया किमतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने २८ डिसेंबर २०१८ रोजी म्हाडाला पत्र पाठवून याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहे. राज्याचे अर्थमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आॅटोरिक्षा चालकांची सदर मागणी पूर्णत्वास आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे साडेचार लाख रुपये एवढया कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या आॅटोरिक्षा चालकांच्या मागणीचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यासंदर्भात २० नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. आॅटोरिक्षा चालकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा कॉलनीतील घरे साडेचार लाखांपर्यंत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नविन चंद्रपूर येथील आरक्षण क्रमांक ७९ व ८० मौजा कोसारा येथे आॅटोरिक्षा चालकांकरिता नागपूर मंडळातर्फे प्रस्तावित घरकुल योजनेबाबत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावामध्ये सदर सदनिकांची किंमत सात लाख ५६ हजार प्रति सदनिका अशी दर्शविण्यात आली आहे. सदर किंमत रुपये साडेचार लाख इतकी करण्यात यावी, अशी मागणी आॅटोरिक्षा चालकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सातत्याने रेटली होती. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सदर मागणी पुर्णत्वास आली आहे. सदर मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.