प्रचाराला चार दिवस शिल्लक

By admin | Published: February 12, 2017 12:31 AM2017-02-12T00:31:37+5:302017-02-12T00:31:37+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

Four days left for preaching | प्रचाराला चार दिवस शिल्लक

प्रचाराला चार दिवस शिल्लक

Next

दिग्गज नेते उतरले मैदानात : कर्मचाऱ्यांना इव्हीएम मशिनबाबत प्रशिक्षण
चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी विविध पक्षांचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्याच वेळी प्रशासनानेही मतदानाबाबत पूर्वतयारी सुरु केली आहे.
५६ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ११२ पंचायत समिती मतदारसंघासाठी १६ फेब्रुवारी निवडणूक होत आहे. त्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. संजय धोटे, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, काँग्रेसतर्फे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी खा. नरेश पुगलिया, माजी आ. सुभाष धोटे, डॉ. अविनाश वारजूरकर, डॉ. आसावरी देवतळे, शिवसेनेतर्फे आ. बाळू धानोरकर, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार, राष्ट्रवादीतर्फे सहकार नेते बाबासाहेब वासाडे, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, शेतकरी संघटनेतर्फे अ‍ॅड. वामनराव चटप आदी प्रचाराच्या रणभेरीमध्ये उतरले आहेत. या नेत्यांनी शनिवारी आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.
प्रचारासाठी आता चार दिवस शिल्लक राहिले आहेत. १६ फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी दुपारी ३ वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षा आणि उमेदवारांना प्रचाराची घाई झाली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या नेत्यांचे बळ मिळाले आहे. मात्र, अपक्ष उमेदवारांना स्वत:च्या क्षमतेवर आणि जनसंपर्कावर अवलंबून राहावे लागत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक कामासाठी ड्युटी लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजीपासून ईव्हीएम मशिनबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता निवडणूक अधिकारी आणि या कामात व्यस्त कर्मचारी सज्ज झाले आहेत. मतदारांना निवडणूक ओळखपत्र व मतदान चिठ्ठी देण्यात आलेली आहे. मतदान करताना ज्या मतदारांना फोटो ओळखपत्र दाखवणे शक्य नाही, अशा मतदारांना फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

भाजपने दाखविला बंडखोरांना बाहेरचा रस्ता
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वाधिक मागणी भाजपमध्ये होती. परिणामी भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने आपल्या बंडखोरांवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश संपादन केले. परंतु भाजपमध्ये प्रयत्न करूनही सात कार्यकर्त्यांनी पक्षांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणुकीत उडी घेतली. त्यामुळे कमलाकर लोणकर, देवराव कोठेवार, अश्वजित जनबंधू, राजविलास शामकुळे, चंद्रशेखर रतनकर, सुमन लोहे व मोरेश्वर लोहे यांना जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सहा वर्षांकरिता निलंबित केले आहे.

Web Title: Four days left for preaching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.