ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास चार दिवस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:32 AM2021-09-12T04:32:18+5:302021-09-12T04:32:18+5:30

विकास खोब्रागडे पळसगाव (पिपर्डा) : राज्य शासनाकडून यंदापासून ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात सुरुवात केली. त्याचा फायदा शासनाला ...

Four days left to register on e-crop survey app | ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास चार दिवस शिल्लक

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास चार दिवस शिल्लक

Next

विकास खोब्रागडे

पळसगाव (पिपर्डा) : राज्य शासनाकडून यंदापासून ई-पीक पाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात सुरुवात केली. त्याचा फायदा शासनाला आणि लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. चिमूर तालुक्यातही पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘माझी शेती, माझा सातबारा, मीच भरणार माझा पीक पेरा’ या घोषवाक्याचे आधारे शासनाने सुरू केलेल्या ई-पीक पाहणी करण्याचा १५ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास अवघे चार दिवस उरले असूनही ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. तर काही ठिकाणी महसूल प्रशासनाला ई-पीक पाहणी ॲपचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी लागत आहे. महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी ॲपवर माहिती भरण्याची शेतकऱ्यांनी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत आहे. ही मुदत संपत आहे.

ई-पीक पाहणी या उपक्रमासाठी तयार केलेल्या ॲपमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यासह तलाठी महसूल अधिकारी यांना डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ॲपवर माहिती भरताना पेरणी योग्य, पोत खराब, पडितचे प्रकार, सिंचित, अजल सिंचित किंवा इतर महसूल शब्द त्याचा अर्थ आणि वापर याची सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. महसुली शब्दाचा वापर करण्यात आला नसल्याने प्रत्यक्ष ई-पीक पेरा भरताना अनेक चुका होण्याची शक्यता असल्याचे मत गावातील संगणक परिचालक, तरुण युवक, जाणकार व्यक्तीकडून व्यक्त होत आहे.

बॉक्स

अशा येत आहेत अडचणी

बऱ्याच खातेदारांना ॲप डाऊनलोड केल्यावर इंटरनेट आवश्यक आहे, असा मेसेज येतो. माहिती भरल्यावर पिकाचा फोटो काढताना बऱ्याच जणांना जिओ टॅग आवश्यक आहे, असा मेसेज येत आहे. त्यामुळे पिकांचा फोटो काढता येत नाही आणि माहितीसुद्धा अपलोड करता येत नाही. मिश्र पीक, आंतरपीक भरताना शेतकऱ्याची चूक होत आहे. सर्वांत महत्त्वाचे जिओ टॅग असतानाही दुसऱ्याच्या शेतात जाऊन स्वतःच्या पिकाचा फोटो अपलोड करता येत आहे, ही सर्वांत मोठी त्रुटी आहे. त्यामुळे या बाबींकडे लक्ष देऊन शासनाने मुदत वाढविण्याची मागणी आहे.

110921\screenshot_2021-09-11-09-21-15-77.jpg

ई पीक पाहणी अँप

Web Title: Four days left to register on e-crop survey app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.