मेडिकल स्टोअर्समधून चार लाखांची चोरी

By Admin | Published: December 11, 2015 01:30 AM2015-12-11T01:30:00+5:302015-12-11T01:30:00+5:30

आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या डॉ. गेडाम यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शारदा मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून चार लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले.

Four lakhs of theft from medical stores | मेडिकल स्टोअर्समधून चार लाखांची चोरी

मेडिकल स्टोअर्समधून चार लाखांची चोरी

googlenewsNext

ब्रह्मपुरी: आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळच्या डॉ. गेडाम यांच्या हॉस्पिटलमध्ये असलेल्या शारदा मेडीकलच्या शटरचे कुलूप तोडून चार लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली.
शहरात चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून भुरट्या चोऱ्यांसह दुकान, बँका यासारखी ठिकाणे चोरट्यांच्या रडारवर आहे. ब्रह्मपुरी- आरमोरी रोडवरील रेल्वे क्रॉसिंग जवळ डॉ. खिपेद्र गेडाम यांचे ब्रह्मपुरी हॉस्पिटल आहे. दवाखान्याच्या मुख्य द्वारालगत कुंदन चापले यांचे शारदा मेडीकल आहे. काल बुधवारी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटरचे मजबूत लॉक तोडले. सोबतच बाजूचे दोन कुलूप तोडून मेडीकल स्टोअर्समध्ये प्रवेश केला. दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी दुकान मालकाने ३ लाख ६८ हजार ५०० रुपये, तीस हजार व तीन हजार रुपये ठेवले होते. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करताना तोंडावर रुमाल बांधले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. दुकानात प्रवेश केल्यानंतर दोघेहे चोरटे काही वेळाकरिता बाहेर जाऊन परत आल्याचेही कॅमेऱ्यात दिसते. त्यानंतर दुकानातील संपूर्ण चार लाख रुपये नगदी घेऊन ते पसार झाले. गजबजलेल्या ठिकाणी व दवाखान्याच्या कंपाऊंडमधील दुकानात चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Four lakhs of theft from medical stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.