चार मोटरसायकल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:48+5:302021-07-04T04:19:48+5:30

भद्रावती पोलिसांची कारवाई. फोटो चार मोटरसायकल जप्त : भद्रावती पोलिसांची कारवाई. भद्रावती : शहरातून विविध ठिकाणी चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह ...

Four motorcycle thieves in police custody | चार मोटरसायकल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

चार मोटरसायकल चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Next

भद्रावती पोलिसांची कारवाई.

फोटो

चार मोटरसायकल जप्त : भद्रावती पोलिसांची कारवाई.

भद्रावती : शहरातून विविध ठिकाणी चोरीस गेलेल्या मोटरसायकलसह चार आरोपींना भद्रावती पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ५० हजाराच्या चार मोटरसायकल जप्त केल्या.

यातील प्रशांत शुभांशू मलिक रा. फुकटनगर, रितिक अशोक जांभुळकर (२१) रा. डोलारा तलाव, प्रज्वल बबन व एक विधिसंघर्ष बालक अशा चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या आठवड्यात चोरीचा गुन्हा दाखल झालेली मोटरसायकल प्रशांतकडे असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे अटक केल्यानंतर यातील चारही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एमएच ३४ बीजे ६४३८, एमएच ३२ एएन ७७५३, एमएच ३४ बीई ९१४३, एमएच ३४ एडब्ल्यू ६१८१ या चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार, केशव चिटगिरे, हेमराज प्रधान, शशांक बदामवार, सचिन गुरनुले यांनी केली.

Web Title: Four motorcycle thieves in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.