महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:28 AM2021-04-21T04:28:33+5:302021-04-21T04:28:33+5:30
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चार कर्मचाऱ्यांचा एका महिन्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुविधा देतानाच स्वत:चीही ...
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील चार कर्मचाऱ्यांचा एका महिन्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुविधा देतानाच स्वत:चीही काळजी घ्यावी, नियमित सॅनिटायझर, मास्क तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, महावितरणच्या नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विजेची सेवा देताना स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे तसेच कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
परिमंडळातील १० कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी चंद्रपूर परिमंडळातील अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
बाॅक्स
२५३ कर्मचाऱ्यांचेच लसीकरण
चंद्रपूर परिमंडळातील १४३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यापैकी ६५ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून सद्य:स्थितीत ७४ कर्मचारी रुग्णालय व घरी उपचार घेत आहेत, तर ४ सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चंद्रपूर परिमंडळातील कार्यरत १ हजार ८८३ नियमित तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५३ कर्मचाऱ्यांनी करोनाची लस घेतली आहे. येत्या दोन आठवड्यात जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालय प्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्य अभियंता यांनी दिले.
--
फ्रंटलाइन वर्कर म्हणून शासनाने वीज कर्मचाऱ्यांनी अद्यापही मान्यता दिली नाही. त्यामुळे काही कर्मचारी संघटनांनी यासाठी शासनस्तरावर मागणी केली आहे. यासंदर्भातही तसेच लसीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.