मध्यम प्रकल्पात चार टक्के जलसाठा
By admin | Published: June 1, 2016 01:47 AM2016-06-01T01:47:19+5:302016-06-01T01:47:19+5:30
टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वेगाने घसरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मध्यम,
पाण्याची पातळी खालावली : लघु प्रकल्पातही जलसाठा घटला
भंडारा : टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वेगाने घसरली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मध्यम, लघु प्रकल्प व माजी मालगुजारी तलावांमध्ये सरासरी केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक आहे. ही आकडेवारी भीषण पाणीटंचाईचे संकेत देणारी आहे.
जिल्ह्यात लघू पाटबंधारे विभाग (राज्य) अंतर्गत ६३ प्रकल्प आहेत. यामध्ये ४ मध्यम, ३१ लघु तर २८ जुने मालगुजारी तलाव आहेत.
जिल्ह्यातील चांदपूर, बघेडा, बेटेकर बोथली आणि सोरणा या चार प्रकल्पांमध्ये १.७३९ दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४.०६ इतकी आहे. चांदपूरमध्ये ५.०४२, बघेडामध्ये ६़२३६ टक्के पाणी आहे. मोहाडी तालुक्यातील बेटेकर (बोथली) आणि सोरणा प्रकल्पामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. भंडारा जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावनवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कार्तुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या लघु प्रकल्पांमध्ये एकूण ४.३३१ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ८.०९ इतकी आहे. ३१ लघु प्रकल्पांपैकी नऊ प्रकल्पांमध्ये जलसाठा शुन्य टक्के आहे. २८ माजी मालगुजारी तलावात सद्यस्थितीत २.५३३ दलघमी जलसाठा असून त्याची टक्केवारी ९.९८ आहे. २८ माजी मालगुजारी १४ तलाव कोरडे आहेत. (प्रतिनिधी)