सावली तालुक्याला चार खासगी रुग्णवाहिका देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:21 AM2021-04-29T04:21:19+5:302021-04-29T04:21:19+5:30
यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी ...
यावेळी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, तहसीलदार परीक्षित पाटील, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मनीषा वाजळे, सिंदेवाही नगरपंचायतचे उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी उपाध्यक्ष नितीन दुधावर, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असली, तर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. यातून रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अतिरिक्त ऑक्सिजन बेड कार्यान्वित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कोविड रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन प्लांट व अन्य साहित्याची खरेदी केली जात आहे.
कोविड केअर सेंटरची पाहणी
राष्ट्रपिता महात्मा गांधी शाळा मूल येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरची पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पाहणी केली. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक सुविधांची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी ४८ आयसोलेशन तर दोन ऑक्सिजन असे एकूण ५० बेड्स कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध आहेत. सावली तालुक्यातील चक विरखल येथे तांगडे यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट दिली.