मूल शहरात कोविड लसीकरणासाठी चार पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:10+5:302021-04-09T04:30:10+5:30
मूल : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषद मूलने पुढाकार घेऊन शहरातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा ...
मूल : कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषद मूलने पुढाकार घेऊन शहरातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा संकल्प करून चार पथक तयार करण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने कन्नमवार सभागृहात नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. उज्वल इंदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुमेध खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रभाकर भोयर आदी उपस्थित होते. यावेळी चार पथकाची निर्मिती करण्यात आली असून, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड लसीकरण करण्यासाठी कन्नमवार सभागृहात आधार कार्ड घेऊन यावे, असे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी आवाहन यावेळी केले. यावेळी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत कोविड लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसून आले.