वाहनचालकांकडून चार हजार रुपये दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:23 AM2020-12-26T04:23:25+5:302020-12-26T04:23:25+5:30

चंद्रपूर : नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ट्रक चालविणाºया दोन चालकांवर पडोली पोलिसांनी गुरूवारी रात्री कारवाई केली. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा ...

Four thousand rupees fine was recovered from the drivers | वाहनचालकांकडून चार हजार रुपये दंड वसूल

वाहनचालकांकडून चार हजार रुपये दंड वसूल

Next

चंद्रपूर : नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ट्रक चालविणाºया दोन चालकांवर पडोली पोलिसांनी गुरूवारी रात्री कारवाई केली. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक साहित्य टाकून वाहतूक केली जात होती. शिवाय, वाहतुकीचा परवानाही नव्हता. त्यामुळे पोलिसांनी वाहनचालकांवर भांदवी कलम २८३ अन्वये गुन्हा दाखल करून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नागपूर मार्गावर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

चंद्रपूर : मद्य प्राशन करुन दुचाकीने नागपूरकडे जाणाºया दोघांवर चंद्रपूर शहर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० वाजता कारवाई केली. हे मद्यपी दुचाकीचालक रस्त्यावरील नागरिकांचा जीव धोक्यात टाकून वाहन दामटताना दिसले. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून अडविण्यात आले. दोन्ही वाहनचालकांवर कलम १८४, १८५ मोकावा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोजगार हमीची कामे

सुरू करावी

चिमूर : परिसरात शेतमजुरांची संख्या बरीच आहे. मात्र, रोहयोची कामे सुरू करण्यात आली नाही. मागील वर्षी जिल्हा प्रशासनाने सिंचन व कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक कामे सुरू केली होती. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. मात्र, यावर्षी जॉबकार्ड वाटप करूनही काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे कुटुंब कसे चालावे, हा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.

बाबूपेठ परिरातील अनेक

वार्डात घाणीचे साम्राज्य

चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील विविध वॉर्डात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वार्डातील नाल्यांचा उपसा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार होऊ शकतात. मनपाचे स्वच्छता कर्मचारी या परिसरातील प्रमुख वार्डात दररोज येतात. मात्र, आडवळणाच्या प्रभागात जात नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत.

जिल्ह्यात १९ इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यातील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये कलम १०७ दंड प्रक्रिया अन्वये १५, कलम १५१ (१) दंड प्रक्रिया संहिता अन्वये दोन, कलम ११०/११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये दोन अशा एकूण १९ जणांवर प्रतिबंध कारवाई केली.

नुकसानग्रस्त शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत

राजुरा : विविध किडींचा प्रादुर्भाव व अल्प पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनाही मोबदला मिळाला नाही. जमीन अधिग्रहित करणाºया कुंटुबातील नागरिकांना नोकरी न मिळाल्याने नाराजी आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी अन्यायग्रस्त शेतकºयांनी केली आहे.

पंचायत समितीतील रिक्त

पदे भरण्याची मागणी

चिमूर : पंचायत समितीत अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे विविध योजना पोहोचविताना कर्मचाºयांची दमछाक होत आहे़ राज्य व केंद्र शासनाने शेतीसाठी अनेक योजना सुरू केल्या़ जिल्हा परिषदच्याही विविध योजना आहेत़ या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही़ त्याचा अनिष्ट परिणाम अंमलबजावणीवर झाला आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील रस्त्यांची दुरूस्ती करावी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांची व गावाला जोडणाºया रस्त्यांची कित्येक वर्षे लोटूनही अवस्था जैसेथे आहे. या रस्त्याचे भाग्य उजळणार कधी, असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात असून दुरुस्तीची मागणी आहे.

अवैध वाहतुकीवर

पोलिसांची कारवाई

चंद्रपूर : पडोली परिसरात कोळसा तसेच अन्य साहित्याची अवैध वाहतूक करणाºया तीन ट्रकवर पोलिसांनी गुरूवारी रात्री ११ वाजता कारवाई केली. वाहनमालकांकडून १२ हजारांचा दंड वसूल केला

अनावश्यक झुडुपे

तोडण्याची मागणी

चंद्रपूर : तुकूम व दुर्गापूर परिसरातील अनेक मोकळ्या जागेत व नागरिकांच्या घरासमोर, नाल्यांच्या काठावर अनावश्यक झुडुपे व गवत वाढले आहे. या झुडुपांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मातानगर वार्डातील

नाल्या तुंबल्या

चंद्रपूर : मातानगर वार्डातील नाल्यांची स्वच्छता झाली नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छता कर्मचारी नियमित येत नाही. पावसामुळे सांडपाणी अडले. वार्डात दुर्गंधीने निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मागासवर्गीय युवकांसाठी

कर्ज योजना

चंद्रपूर : राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत ओ.बी.सी. प्रवर्गातील युवक व युवतींकरिता स्वयंरोजगारासाठी कृषी व संलग्न व्यवसाय, लघु उद्योग, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपरिक व्यवसाय वा सेवा उद्योगासाठी राष्ट्रीयीकृत बँक व महामंडळाकडून २० टक्के बिज भांडवल योजना शासनाने सुरू आहे. योजनेतंर्गत व्यवसायासाठी पाच लाखांपर्यंत कर्ज दिल्या जाते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Four thousand rupees fine was recovered from the drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.