ब्रह्मपुरीत आढळले डेंग्यूचे चौदा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:42+5:302021-08-19T04:31:42+5:30
पावसाळ्याची सुरुवात होण्याआधीच नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेची विविध कामे हाती घेण्यात येतात. डासांची पैदास होऊ नये म्हणून विविध प्रकारची ...
पावसाळ्याची सुरुवात होण्याआधीच नगर परिषद प्रशासनाकडून स्वच्छतेची विविध कामे हाती घेण्यात येतात. डासांची पैदास होऊ नये म्हणून विविध प्रकारची फवारणी नाल्यांमध्ये करण्यात येते. मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांअभावी फवारणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. जून ते १५ ऑगस्टपर्यंत एकूण चौदा नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद ग्रामीण रुग्णालय येथे आहे. ग्रामीण भागात हा आकडा निरंक आहे. नगर परिषदेने फवारणी कर्मचारी वाढवून शहरातील फवारणीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बॉक्स
लोकमतने केलेले भाकीत ठरले खरे
ब्रह्मपुरीत डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, मलेरियाचा वाढला धोका'' या मथळ्याखाली २९ जुलैला वृत्त प्रकाशित करुन नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तरीदेखील या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळेच डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने केलेले भाकीत खरे ठरल्याचे दिसून येते.
180821\img_20210728_100445.jpg
नगरपरिषदेचे प्रवेशद्वार