महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

By admin | Published: June 15, 2014 11:26 PM2014-06-15T23:26:35+5:302014-06-15T23:26:35+5:30

पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले.

Fraud Crime Against Women | महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

महिलेसह दोघांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे

Next

गोंडपिपरी : पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून अर्ज भरताना तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचू डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले. ही बाब लक्षात येताच, येथील तहसीलदारांनी समाजकल्याण अधिकाऱ्याशी संपर्क करुन त्याची खातरजमा केली. त्यानंतर यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता, अटक केलेल्या वासुदेव डोंगरे याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून याच प्रकरणातील लक्ष्मी मोहुर्ले हिला अद्यापही अटक करण्यात आली नाही.
तालुक्यातील सात ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक २२ जून रोजी निवडणूक घेण्यात येत आहे. यात राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्याकरिता जात प्रमाणपत्राची अट आहे. तालुक्यातील गोजोली येथील वासुदेव पोचु डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांनी बनावट जात प्रमाणपत्र तयार करुन उमेदवारी अर्ज तहसीलदार विराणी यांचेकडे सादर केला. मात्र विराणी यांना वासुदेव डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस असल्याची माहिती अगोदर मिळाली होती. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेले प्रमाणपत्र खरे की खोटे, हे जाणून घेण्यासाठी थेट समाजकल्याण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. प्रमाणपत्र खोटे असल्याबाबतची खात्री पटताच तहसीलदार विराणी यांनी गोंडपिपरी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीवरुन वासुदेव डोंगरे व लक्ष्मी मोहुर्ले यांच्याविरुद्ध भादंवि ४६८, ४७१, ४२०, ३४ कलम अन्वये गुन्ह्याची नोंद करुन काल रात्री वासुदेव डोंगरे याला अटक केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fraud Crime Against Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.