दामदुपटीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:18 AM2021-07-05T04:18:21+5:302021-07-05T04:18:21+5:30
मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक ...
मागील आठ महिन्यांपूर्वी वडगाव परिसरात धनलक्ष्मी फायनान्स कंपनी सुरू केली. ग्राहकांना दामदुपटीचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे अनेकांनी येथे गुंतवणूक केली. परंतु, पैसे परत करण्यापूर्वीच ही कंपनी बंद केली. याबाबतची तक्रार ओमकार नगर येथील दिगांबर आत्राम यांच्यासह अन्य १५ जणांनी १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार १६ डिसेंबर २०२० रोजी रामनगर पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. मागील आठ महिन्यांपासून पोलिस आरोपींच्या शोधात होते. परंतु, आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. रविवारी रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार कमलेश जयस्वाल यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर भद्रावती येथून प्रवीण सोळंखी याला अटक केली. फरार आरोपींच्या शोधात पथक गठित केली असून फरार आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती ठाणेदार जयस्वाल यांनी दिली.