दोन विविध प्रकरणात दोघांची हजारो रुपयांनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:14+5:302021-01-08T05:32:14+5:30
वेकोलि दुर्गापूरच्या कार्यालयात कार्यरत एका महिलेला मोबाईल नं. ९३३०५२६११९ वरून रविवारी एक फोन आला. त्यावरुन फोन पे अॅप सुरू ...
वेकोलि दुर्गापूरच्या कार्यालयात कार्यरत एका महिलेला मोबाईल नं. ९३३०५२६११९ वरून रविवारी एक फोन आला. त्यावरुन फोन पे अॅप सुरू करायचे आहे का, असे विचारण्यात आले. त्यास फिर्यादीने होकार दिला असता अॅनी डेस्क नावाची अॅप डाऊनलोड करून इन्स्टाॅल करायला लावले. त्यानंतर एक नंबर विचारण्यात आला. तो सांगितल्यानंतर फोन पे अॅप सुरू करण्याकरिता सांगितले. त्यात एटीएम कार्डची माहिती भरायला लावली. लगेचच ओटीपी येणे सुरू झाले. त्यानंतर एका पाठोपाठ १०६४, ३१९८, १००५, १६,४९० व १९६४ असे एकूण २३,७१६ रुपये काढून फसवणूक करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात सोमवारी मसाळा गावातील संतोष दुर्योधन यांना ऊर्जानगर पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या पार्सलमध्ये ११ हजार रुपयाचा चेक व मोबाईलऐवजी न्यूज पेपर व चुन्याचा डबा पाठवून ३,६०० रुपयांनी गंडविण्यात आले. याअगोदरही असेच पार्सल पाठवून अनेकांची फसवणूक झाली आहे.