आरोग्य सेवेच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:35+5:302021-02-17T04:34:35+5:30
अथर्व वेल्फेअर सोसायटी या लखनौ (उत्तर प्रदेश) येथे मुख्य कार्यालय संस्थेंतर्गत अथर्व ॲग्रिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड, शाखा चंद्रपूर ही ...
अथर्व वेल्फेअर सोसायटी या लखनौ (उत्तर प्रदेश) येथे मुख्य कार्यालय संस्थेंतर्गत अथर्व ॲग्रिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड, शाखा चंद्रपूर ही खासगी संस्था आहे. संस्थेकडून पदे भरण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून नोंदणी फी, वर्गणी व देणगीच्या नावाखाली जनतेकडून रक्कम उकळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी औषधे वाटणाऱ्यांना कोणीही पैसे देऊ नये. रक्कम मागणारे आढळल्यास आरोग्य व पोलीस विभागाला कळवावे. आरोग्य विभागाने याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. संस्थेकडून आयुष मंत्रालयाच्या नावाचा गैरवापर करून ज्या बेरोजगार युवकांना पैसे घेऊन नियुक्ती दिली, त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविण्यास पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने परवानगी नाकारली
अथर्व ॲग्रिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड, शाखा चंद्रपूर या खासगी संस्थेने जिल्ह्यात होमिओपॅथिक औषध वाटप कार्यक्रम व लोकशिक्षणाचा प्रकल्प राबविण्याकरिता आरोग्य विभागाकडे परवानगी मागितली होती; परंतु आरोग्य विभागाने परवानगी नाकारली, अशी माहिती डॉ. गहलोत यांनी दिली.