२४ तासात ३९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:33 AM2021-01-08T05:33:09+5:302021-01-08T05:33:09+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १९ ...
चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ३९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १९ कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून, एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४२१वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ६८१ झाली आहे. सध्या ३६८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७८ हजार ७२९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ५३ हजार ५९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये बल्लारपूर शहरातीन ७८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७२ बाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३९, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधित आलेल्या १९ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुका पाच, भद्रावती दोन, ब्रह्मपुरी तीन व चिमूर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही. कोरोनाचे रुग्ण कमी - अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून अद्याप आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.