दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी मोफत ऑटोसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:15+5:302021-04-30T04:36:15+5:30

भद्रावती : भद्रावती शहरातील दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यासाठी कोविड लसीकरण केंद्रापर्यंत सहजपणे पोहोचता यावे, यासाठी भद्रावती येथील ...

Free auto service to take the disabled to the vaccination center | दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी मोफत ऑटोसेवा

दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी मोफत ऑटोसेवा

Next

भद्रावती : भद्रावती शहरातील दिव्यांग व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यासाठी कोविड लसीकरण केंद्रापर्यंत सहजपणे पोहोचता यावे, यासाठी भद्रावती येथील युवा सेनेतर्फे रोज मोफत ऑटोसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सेवेमुळे शहरातील दिव्यांगांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होऊन ते कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित राहतील, असा विश्वास युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील कोविड लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने शहरातील दिव्यांग नागरिकांना नोंदणी करून लसीकरण करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यातल्या त्यात कोविड लसीकरण केंद्र लांब असल्यामुळे दिव्यांगांना तिथे जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी अनेक दिव्यांग हे लसीकरण करण्यापासून वंचित राहत आहेत. सध्या शहरातील वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता दिव्यांगांच्या आरोग्यासाठी ही बाब धोकादायक ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन युवा सेनेतर्फे सामाजिक बांधीलकीतून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेत दिव्यांगांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना मोफत ऑटोसेवा पुरवून त्यांचे कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्याकरिता युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, नगरसेवक पप्पू सारवान, युवा सेना तालुकाप्रमुख महेश जीवतोडे, कल्याण मंडल, आदी युवा सेनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Web Title: Free auto service to take the disabled to the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.