पालकांचे छत्र हरविलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:14+5:302021-05-29T04:22:14+5:30
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र दहशत माजवलेली आहे. यामध्ये अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आई-वडिलांनासुद्धा ...
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोनाने सर्वत्र दहशत माजवलेली आहे. यामध्ये अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना आई-वडिलांनासुद्धा गमवावे लागले. त्यामुळे पुढील शिक्षणाचा खर्च कोण करणार, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यामुळे अशा पालकांच्या मदतीला एमके क्लास धावून आले असून आयआयटी तसेच नीटचे मोफत शिक्षण देणार आहे.
नांदेड व लातूर येथे असणारे एमके क्लासची शाखा चंद्रपूरमध्येसुद्धा आहे. संचालक डॉ. आशिष वांढरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत पालक गमावलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयआयटी, नीटचे शिक्षण मोफत देण्याचा निर्यय घेतला आहे. कोरोनामुळे पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. आशिष वांढरे, एमके क्लासचे कार्यालय जिल्हा स्टेडियमच्या बाजूला, एलटीव्ही शाळेसमोर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वा.प्र)