मोफत रूग्ण बससेवेने हजारो रूग्णांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:01 AM2018-10-26T01:01:05+5:302018-10-26T01:01:26+5:30

वर्धा जिल्ह्यातील सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाने जिल्ह्यातील रूग्णांसाठी मंगळवारी व गुरूवार असे दोन दिवस भद्रावती येथून मोफत रूग्ण बससेवा सुरू केली. आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे, ....

Free hospital service relief to thousands of patients | मोफत रूग्ण बससेवेने हजारो रूग्णांना दिलासा

मोफत रूग्ण बससेवेने हजारो रूग्णांना दिलासा

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : रूग्णांसाठी भद्रावती येथून बससेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वर्धा जिल्ह्यातील सावंगी(मेघे) येथील आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालयाने जिल्ह्यातील रूग्णांसाठी मंगळवारी व गुरूवार असे दोन दिवस भद्रावती येथून मोफत रूग्ण बससेवा सुरू केली. आर्थिकदृष्ट्या गरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सावंगी रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मेघे, तहसीलदार शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पवार, विजय राऊत, चंद्रकांतगुंडावार, नगरसेवक राजेश मून, राहुल सराफ, विजय वानखेडे, नरेंद्र जिवतोडे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, नगरसेविका जयश्री दातारकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
सोमवारपासून भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून ही बस वर्धा शहरात जाईल. बससेवेमुळे भद्रावती व वरोरा ग्रामीण व शहरी गरजु रूग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. रूग्णांच्या आर्थिक व शारीरिक अडचणी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. वेळेची बचत होईल. रूग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळतील.
संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ताजी मेघे यांनी सेवाभावी वृत्तीने ही बससेवा सुरू करण्यास अनुमती दिली. जिल्ह्यातील रूग्णांच्या सेवेला चालना मिळणार आहे, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी व्यक्त केले. लता ढुमणे, प्रवीण सातपुते, किशोर गोवारदिपे, लोनकर, अफजल भाई, सौ. लताताई भोयर, अण्णाजी खुटेमाटे, पुरूषोत्तम मत्ते उपस्थित होते. बससेवेचा जिल्ह्यातील गरजू रूग्ण व कुटुंबियांनी लाभ घेतला पाहिजे असे सांगून अभ्युदय मेघे विविध आरोग्य योजनांची यावेळी माहिती दिली.

Web Title: Free hospital service relief to thousands of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.