बल्लारशाह रेल्वे स्थानकावर नि:शुल्क पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:34 AM2021-09-09T04:34:12+5:302021-09-09T04:34:12+5:30
बल्लारपूर : रेल्वे प्रवाशांची दिवसभर वर्दळ असलेले रेल्वे स्थानक म्हणजे बल्लारशाह रेल्वे जंक्शन होय. या स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनतळाचीही ...
बल्लारपूर : रेल्वे प्रवाशांची दिवसभर वर्दळ असलेले रेल्वे स्थानक म्हणजे बल्लारशाह रेल्वे जंक्शन होय. या स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनतळाचीही व्यवस्था आहे. परंतु, मागील सहा महिन्यांपासून रेल्वे प्रवाशांसाठी ही व्यवस्था नि:शुल्क असल्यामुळे प्रवासी आनंदी असले तरी वाहनतळावर लावलेल्या फलकाचा धसकाही त्यांच्या मनात आहे.
सध्या कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावर विशेष गाड्यांचा येरझारा होत आहे. असे असले तरी रोज बाहेर जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. हे प्रवासी आपले वाहन स्थानकासमोरील वाहनतळावर ठेवतात. परंतु, सध्या ठेकेदार नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांसाठी वाहन ठेवण्याची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. त्यामुळे येथून जर वाहन चोरीला गेले किंवा काही कमी-जास्त झाले तर ही जबाबदारी वाहन मालकाची राहील, असेही येथील फलकावर लिहिले आहे. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर परत येईपर्यंत संबंधित प्रवासी धास्तावलेला असतो. परंतु, गत सहा महिन्यांच्या काळात याठिकाणी प्रवाशांची वाहने सुखरूप असल्याचे सांगण्यात येते.
080921\pparking.jpg
रेल्वे स्थानकावर निशुल्क पार्किंग