बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा
By admin | Published: August 26, 2014 11:21 PM2014-08-26T23:21:49+5:302014-08-26T23:21:49+5:30
बाबूपेठ परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बाबुपेठ उड्डाण पुलाचा नकाशा आणि ३३ लाख रुपये राज्य
चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील नागरिकांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून बाबुपेठ उड्डाण पुलाचा नकाशा आणि ३३ लाख रुपये राज्य शासनाने विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे सादर केल्याने या पुलाचा मार्ग मोकळा होणर असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
बाबूपेठ रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाण पूल नसल्याने या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. गेट वारंवार बंद होत असल्याने चंद्रपूर शहरात येणाऱ्यांसाठी या गेटजवळच तासंतास ताटकळत राहावे लागत असते. परिणामी या उड्डाण पुलाच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन आणि मोर्चे काढण्यात येत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून या पुलाच्या कामासाठी नागरिकांची ओरड सुरू आहे. राज्य शासन आणि रेल्वे विभाग यांच्यातील समन्वयाअभावी उड्डाण पुलाचा प्रश्न प्रलंबित होता.
अलीकडेच या पुलाचा नकाशा आणि राज्य शासनाने भरावयाची रक्कम २२ आॅगस्टला मंडळ रेल्वे अधिकारी ओ.पी. सिंग यांच्याकडे सादर केली. यावेळी खासदार, हंसराज अहीर, आमदार श्यामकुळे, वरिष्ठ विभागीय अभियंता एच.एल. कावरे, सहाय्यक अधीक्षक अभियंता टांगले, कार्यकारी अभियंता तेलंग उपस्थित होते. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे क्रॉसिंग येथे दोन रेल्वेलाईन आहेत. या दोन्ही विभागांची परवानगी घेण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी या रेल्वे गेटवर डागडुजीचे काम करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती.
(नगर प्रतिनिधी)