ब्रह्मपुरी येथे ३० रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया
By admin | Published: October 25, 2015 12:56 AM2015-10-25T00:56:35+5:302015-10-25T00:56:35+5:30
इंटरनॅशनल सोसायटी आॅफ कोलोप्रोक्टोलॉजी अंतर्गत नागपूर सर्जन्स अशोशिएशन, विदर्भ सर्जन असोशिएशन, ब्रह्मपुरी मेडीकल असोशिएशन ...
नॅशनल कोलोरेक्टर सर्जिकल वर्कशॉप : विविध संघटनांचा पुढाकार, नामांकित डॉक्टरांचा सहभाग
ब्रह्मपुरी : इंटरनॅशनल सोसायटी आॅफ कोलोप्रोक्टोलॉजी अंतर्गत नागपूर सर्जन्स अशोशिएशन, विदर्भ सर्जन असोशिएशन, ब्रह्मपुरी मेडीकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्थानिक लाडूकर सर्जिकल हॉस्पिटलमध्ये ३० रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली.
तीन दिवसीय नॅशनल कोलोरेक्टर सर्जिकल वर्कशॉपमध्ये भारतातील ५० सर्जन सहभागी झाले होता. देशातील विविध राज्यातून आलेल्या सर्जन्सनी कोलोप्रोक्ट्रॉलॉजी (मोठे आतडे व गुदद्वाराशी संबंधित) पाईल्स, फीशर आदी सर्जरीचे अध्ययन व वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष कार्यानुभव घेतला. या शिबिरात एकाचवेळी ३० शस्त्रक्रीया होण्याचे हे जवळपास एकमेव आयोजन होते. युनायटेड सिग्मा हॉस्पिटल औरंगाबाद येथून कोलोनोस्कोपीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी दत्ता मेघे युनिव्हसिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. दिलीप गोडे तर प्रमुख अतिथी डॉ. बी.एस. गेडाम लता मंगेशकर हॉस्पिटलीटल नागपूर, डॉ. वाय.एस. देशपांडे, डॉ. सतीश देशमुख, ब्रह्मपुरीचे प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया, नगराध्यक्षा रिता उराडे, अॅड. गोविंद भेंडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
शिबिराचे औचित्य साधून मदुराई (तामीळनाडू) येथील वयोवृद्ध सर्जन डॉ. पी. शिवलिंगम यांचा या कार्यशाळेत सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेला डॉ. शांतीकुमार चिवटे, डॉ. वसंत पिलारे, डॉ. पालीवाल, डॉ. राजश्री भांडारकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरात सर्व सर्जन्सची परीक्षा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या सर्जन्सना २०१६ मध्ये जयपूर येथे होणाऱ्या वर्ल्डकॉर्नमध्ये फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कीर्ती लाडूकर, प्रास्ताविक डॉ. लक्ष्मीकांत लाडूकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा लाडूकर, डॉ. प्रशांत राहाटे, हृषीकेश गोखरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अभिषेक आणि कार्तिक दहीकर प्रस्तुत संगीत रजनीने करण्यात आली. (प्रतिनिधी)