दिव्यांग बांधवांसाठी मोफत ताडोबा सफारीचा शानदार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:13 PM2019-06-26T23:13:16+5:302019-06-26T23:13:28+5:30

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना ताडोबाची सफर करता यावी व विविध प्राणी, पक्षी बघून त्यांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टीकोनातून राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी केलेल्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच जिल्ह्याच्या वन विभागाने दिले आहे. दिव्यांगांसाठी ताडोबा सफारीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

Free Tadoba Safari's free launch for Divyang brothers | दिव्यांग बांधवांसाठी मोफत ताडोबा सफारीचा शानदार शुभारंभ

दिव्यांग बांधवांसाठी मोफत ताडोबा सफारीचा शानदार शुभारंभ

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्याच्या घोषणेला आले मूर्तस्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना ताडोबाची सफर करता यावी व विविध प्राणी, पक्षी बघून त्यांना निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा, या दृष्टीकोनातून राज्याचे वित्त, नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १२ जून रोजी केलेल्या घोषणेला प्रत्यक्ष मूर्तरूप जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण तसेच जिल्ह्याच्या वन विभागाने दिले आहे. दिव्यांगांसाठी ताडोबा सफारीचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते चंद्रपूर येथे १२ जून रोजी पार पडलेल्या दिव्यांगांसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आले होते. यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्याच्या मोफत सफारीचा आनंद दिव्यांगांना देण्याची घोषणा केली होती. या अगोदर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना अशा मोफत ताडोबा सफारीचा उपक्रम पालकमंत्र्यांनी राबविला आहे. ताडोबामध्ये जगभरातून व्याघ्र दर्शनासाठी तसेच पर्यावरण अभ्यासासाठी पर्यटक मोठया उत्सुकतेने येत असतात आणि येथील जैवविविधता तसेच नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेऊन आनंदाने मायदेशी परत जातात. अशा आनंदापासून स्वत:च्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधव वंचित राहू नये, त्यांनाही मातृभूमीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता यावे, जगप्रसिद्ध वाघाचे दर्शन घेता यावे, विविध प्राणी पक्षी व अनोखी जैवविविधता स्वत:च्या डोळ्याने प्रत्यक्ष बघता यावी हाच त्यामागचा उद्देश आहे.
म्हणूनच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने यात हिरिरीने पुढाकार घेत रविवारी वनविभागाच्या सहकार्याने मोफत ताडोबा सफारीचा अनोखा अनुभव दिव्यांगाना करून दिला. यावेळी सीसीएफ गुंडावार तसेच शैलेंद्र सिंग बैस उपस्थित होते.

Web Title: Free Tadoba Safari's free launch for Divyang brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.