महाआरोग्य शिबिरात ३ हजार रूग्णांची मोफत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 01:09 AM2019-08-02T01:09:19+5:302019-08-02T01:09:46+5:30

राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ३ हजार २२० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हे शिबिर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पार पडले.

Free trial of 3,000 patients in maladministration camp | महाआरोग्य शिबिरात ३ हजार रूग्णांची मोफत तपासणी

महाआरोग्य शिबिरात ३ हजार रूग्णांची मोफत तपासणी

Next
ठळक मुद्देरूग्णांच्या चेहऱ्यावर हास्य : सावंगी मेघे रूग्णालयात होणार शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस येथे घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात ३ हजार २२० रूग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. हे शिबिर जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पार पडले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कडीर्ले, महाराष्ट्र मेडिकलचे सदस्य डॉ. गिरीश मैंदडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.पी. गहलोत, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, डॉ. रवी आलुरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. सुशिल मुंदडा, डॉ. मंगेश टिपणीस, डॉ. अजय दुददलवार, डॉ. नसरिन मावानी, फादर रॉबर्ट निकोलस प्राचार्य वियाणी, वेकोलिचे व्यवस्थापक उदय कावळे, चिचपल्ली येथील बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्रमुख संचालक राहुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य नितु चौधरी, प्रवीण सुर, विवेक बोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
घुग्घुस येथे काही वर्षांपासुन आरोग्य शिबिर घेतल्या जात आहे. घेण्यात येते आहे. जि. प. अध्यक्ष भोंगळे यांच्या प्रमुख नेतृत्वात यावर्र्षीही सुदधा वियानी विद्या मंदिराच्या परिसरात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. परिसरातील अनेक गावांमधील हजारो नागरिकांनी शिबिराला उपस्थिती दर्शवून रूग्ण सेवेचा लाभ घेतला आहे. शिबिरात ३ हजार २२० रूग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. पुढील उपचार तसेच शास्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर तसेच आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सांवगी मेघे, वर्धा येथील रूग्णालयात केल्या जाणार आहे. आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी केलेल्या रूग्णांना लवकरच चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. शिबिर यशस्वी करण्याकरिता इंडियन मेडिकल असोशिएशन, इंडियन डेंटल असोशिएशन सावंगी मेघे येथील तज्ज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टर, चंद्र्रपूर डिस्ट्रीक केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन परिश्रम घेतले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोरगरिबाच्या कल्याणाकरिता सतत झटत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला. गरजु रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे मोठा आधार मिळाला. अशा प्रकारचे महाआरोग्य शिबिर भविष्यात देखील आयोजन करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष भोंगळे यांनी यावेळी केला.

आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. गरजु रूग्णांना या योजनांचा लाभ मिळावी, याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विशेष लक्ष देत आहेत. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून घेण्यात येणाºया सार्वजनिक कार्यक्रमातून आरोग्य योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. पालकमंत्र्यांच्या या दृष्टीला साजेसा आणि त्यांच्या गोरगरिबांच्या कार्याची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांचा वाढदिवस रुग्ण सेवा दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला. रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. महाआरोग्य शिबिरातील विविध सत्रांमध्ये आरोग्याची माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Free trial of 3,000 patients in maladministration camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.