मधुमेहाच्या उच्चाटनासाठी स्वातंत्र्य मधुमेहापासून उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:19+5:302021-08-22T04:31:19+5:30
चंद्रपूर : भारतातून शत्रूला परतवून लावायला आपणाला यश मिळाले. मात्र, शरीरातील शत्रू म्हणजेच आजार जैसे थे आहेत. त्यामुळे मधुमेहापासून ...
चंद्रपूर : भारतातून शत्रूला परतवून लावायला आपणाला यश मिळाले. मात्र, शरीरातील शत्रू म्हणजेच आजार जैसे थे आहेत. त्यामुळे मधुमेहापासून मुक्ती मिळविण्यासाठी स्वातंत्र्य मधुमेहापासून हा उपक्रम माधवबागच्या वतीने साजरा करण्यात आला. यामध्ये अनेक मधुमेहग्रस्तांनी सहभाग घेतला होता. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारात झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह उच्चरक्तदाब, ब्लॉकेजेस, हृदरोग, लठ्ठपणा आदी आजारांचा समावेश आहे. मधुमेहाचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माधवबागतर्फे स्वातंत्र्य मधुमेहापासून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ३३ मधुमेह रुग्णांची जीटीटी तपासणी करण्यात आली. याद्वारे मधुमेहमुक्त झालेल्याचा निष्कर्ष काढता येतो. यावेळी मागील सहा महिन्यांत उपचार घेत असलेल्याची, तसेच दोन ते तीन महिन्यांपासून उपचार घेत असलेल्याची तपासणी करण्यात आली. यावेळी माधवबागचे संचालक डॉ.लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी मधुमेह, हृदयरोग, ब्लॉकेजेस, उच्चरक्तदाब आदी आजार जीवनशैलीच्या यथायोग्य बदलाने परतावून लावता येते, असे सांगितले, तर डॉ.प्रीती सरबेरे यांनी जीवनशैलीतील बदलामुळे मधुमेह रुग्णांच्या शरीरात होणाऱ्या बदलाविषयी माहिती दिली. याप्रसंगी अनेकांची उपस्थिती होती.