सरपंच निवडीवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये फ्रीस्टाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:27 AM2021-02-13T04:27:39+5:302021-02-13T04:27:39+5:30
सात सदस्य असलेल्या बोरगाव शिवनफळ येथे सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी घेण्यात आली. चार सदस्य काँग्रेस पक्षाकडे तर तीन ...
सात सदस्य असलेल्या बोरगाव शिवनफळ येथे सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी घेण्यात आली. चार सदस्य काँग्रेस पक्षाकडे तर तीन सदस्य शिवसेनेकडे होते. हे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी पोहोचले. वास्तविक, हे गाव शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचे मूळ गाव आहे. या गावात काँग्रेसची सत्ता स्थापन होत असल्यावरून बाहेर काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद उफाळला. प्रकरण हातापायीवर आले. इतकेच नव्हे, तर दोन्ही गटांत तुरळक हाणामारी झाली. दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. त्यातच सरपंच व उपसरपंचपदी काँग्रेसचे सनताराज कुरसंगे व अनिल झाडे हे अनुक्रमे चार विरुद्ध तीन मतांनी विजयी झाले.
ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सातपैकी चार सदस्य काँग्रेसने आपल्या खेम्यात नेले. अन्य तीन सदस्य शिवसेनेकडे होते. काँग्रेसकडे गेलेल्या चारपैकी एक सदस्य शिवसेनेेकडे येणार होता. मात्र, तो तिकडे गेला तरी आमचा काहीही आक्षेप नव्हता. दरम्यानच्या काळात त्यांच्या एका वाहनाला दुचाकी स्पर्शून गेली. यामध्ये एका जणाच्या हाताला दुखापत झाल्याने काही गावकरी संतप्त झाले. त्यांनी वाहनावर दगडफेक केली. याचा घटनेचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही.
- नितीन मत्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना.