वारंवार बत्ती गुल, कोडशी खुर्दवासीय धडकले वीज वितरण कार्यालयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:32 AM2021-09-14T04:32:43+5:302021-09-14T04:32:43+5:30
तालुक्यातील कोडशी खुर्द हे गाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावात ९० टक्के नागरिक ...
तालुक्यातील कोडशी खुर्द हे गाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले गाव आहे. या गावात ९० टक्के नागरिक हे शेती व्यवसाय करतात. परंतु दिवसभर काम करून आल्यानंतर रोज सायंकाळी वीजपुरवठा खंडित होत असतो. हा प्रकार मागील २-३ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे गावातील सरपंच यांच्यासह गावातील नागरिकांनी लाइनमेन यांच्या लक्षात आणून दिली, परंतु त्यांनी त्यांनी गावकऱ्यांच्या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या तशीच राहली. मोर्चेकरांनी ही बाब उपविभागीय अभियंता इंदूरकर व कनिष्ठ अभियंता होकम यांच्या लक्षात आणून देत तत्काळ दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी केली. कोडशी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यलयात बैठक आयोजित करून विजेच्या समस्यांवर तोडगा काढू, असे आश्वासन कनिष्ठ अभियंता होकम यांनी दिले. यावेळी सत्यवान चामाटे, अजय तिखट, गजानन दूरटकर, सतीश बोर्डे, गुलाब मेश्राम, रवी मडावी, मंगेश बोर्डे, विनोद मेश्राम, मारोती जुमनाके, विशाल गेडाम, अनिल जरीले, रंजित पिदूरकर, वासुदेव बोर्डे, संदीप बानकर, सुरज जगनाडे, प्रज्योत बानकर, गंगाराम जुमनाके, अमोल बोर्डे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.