देवाडा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:31 AM2021-09-06T04:31:34+5:302021-09-06T04:31:34+5:30
रात्रीच्या वेळी नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देवाडा येथे ३३ केव्ही सब स्टेशन केंद्र असूनही ...
रात्रीच्या वेळी नागरिकांना वीज नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. देवाडा येथे ३३ केव्ही सब स्टेशन केंद्र असूनही ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे, देवाडा येथूनच १७ गावांमध्ये वीजपुरवठा केला जातो, देवाडाचा वीजपुरवठा एकाच ठिकाणी असल्याने थोडाही पाऊस किंवा वारा सुटला तर वीजपुरवठा खंडित होतो. अशीच शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वीज खंडित झाली. त्यामुळे देवाडा गावाच्या काही अंतरावर असलेल्या ३३ केव्ही येथे गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र महासचिव अब्दुल जमीर यांनी कार्यकर्त्यांसोबत जाऊन चौकशी केली. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर एका आठवड्यात वीजपुरवठा सुरळीत करून देण्यात येईल, असे आश्वासन वीज अभियंत्यांनी दिले. आधीच पावसाळ्याचे व रोगराईचे दिवस आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीज नसली तर घरात डासांचे थैमान सुरू होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास गोंडवाना पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र महासचिव अब्दुल जमीर यांनी दिला आहे.