वारंवार वीज खंडित, नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:46+5:302021-07-02T04:19:46+5:30
नवरगाव येथे ३३ केव्हीचे केंद्र असून, यावरून नवरगाव, रत्नापूर, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, उमरवाही आदी परिसरातील गावांना विद्युतपुरवठा ...
नवरगाव येथे ३३ केव्हीचे केंद्र असून, यावरून नवरगाव, रत्नापूर, आलेसूर, नैनपूर, नाचनभट्टी, उमरवाही आदी परिसरातील गावांना विद्युतपुरवठा केला जातो. या परिसरात विद्युत पुरवठा २४ तास सुरळीत सुरू राहावा, यासाठी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी, शिवाय खासगी ठेकेदाराची माणसे दिमतीला असताना उन्हाळ्यात वाकलेले इलेक्ट्रिक पोल दुरस्त करणे, लोंबकळलेल्या विद्युत वाहक तारा टाईट करणे, विद्युत वाहक तारांच्या संपर्कात येणारी झाडे, फांद्या तोडणे व अशी अनेक कामे करणे अपेक्षित असताना, ते होताना दिसत नाही. थोडाही पाऊस झाला की कुठेतरी विद्युत तारांना झाडांचा स्पर्श झाला तरी वीज खंडित होते. कधी परिसरातील विद्युत ग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. असे प्रकार वारंवार घडत असले, तरी विद्युत बिलामध्ये कोणतीही कमतरता जाणवत नाही. उलट ते वाढतच असते.