शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:00 AM2017-08-02T00:00:58+5:302017-08-02T00:01:26+5:30

शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे,

A Front for Farmers' Association SDO Office | शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

शेतकरी संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : शेतकºयांची संपुर्ण व सरसकट कर्जमुक्ती व्हावी, शेतमालाला रास्त भाव मिळावा, जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे द्यावे, यासह इतर बारा मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राजुरा उपविभागीय कार्यालयावर शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला.
राजुरा येथील भवानी मंदिरापासून निघालेला हा मोर्चा भारत चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा घोषणा देऊन निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. यावेळी प्रभाकर दिवे, अनिल ठाकुरवार, मुर्लीधर देवाळकर, निलकंठ कोरांगे, हरिदास बोरकुटे, प्रभाकर ढवस, नानाजी पोटे, दत्तु ढोके, शेषराव बोंडे, रमेश नळे, दिलीप देरकर, मारोतराव काकडे, देविदास वारे, दिलीप देठे, रवींद्र गोखरे, बंडु राजुरकर, विठ्ठल सोयाम, पोर्णिमा निरांजने, सिंधु बारसिंगे, चंद्रकला ढवस, इंदु बल्की, सुजाता बांबोडे, दिपाली हिंगाणे, इंदु सपाट, संजय करमनकर आदींचा सहभाग होता.
या मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी राजा दयानिधी यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. यात सरसकट व संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्याची मर्यादा ३० जून २०१७ पर्यंत वाढविणे, शेतीपंपाला पूर्ण दाबाची व लोडशेडिंग न करता वीज पुरवठा तसेच शेतकºयांचे थकित विजबिल माफ करावे, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा, शेतकºयांना नवतंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र देण्यात यावे, सर्व जबरानजोत शेतकºयांना तातडीने पट्टे वाटप करावे, केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्यात पट्टा मिळण्यासाठी तीन पिठ्यांची अट रद्द करावी, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे. शिष्टमंडळात बंडु राजुरकर, प्रभाकर लोडे, नरसिंग हामने, विठ्ठल पाल, प्रदिप वांढरे, विलास बोबडे, डॉ. मुसळे, देवराव कोयरे, किसन अवताळे, कवडू पोटे, रामदास पायताडे, दामोदर टोंगे, वासुदेव कुडे, बोंडे, नाना बोंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: A Front for Farmers' Association SDO Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.