शेतकºयांचा मोर्चा धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:25 AM2017-08-09T00:25:57+5:302017-08-09T00:29:17+5:30

राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे.

The front of farmers' front was shocked | शेतकºयांचा मोर्चा धडकला

शेतकºयांचा मोर्चा धडकला

Next
ठळक मुद्देशेकडोंचा सहभाग : तहसीलदारांना दिले ‘माझी कर्जमाफी झाली नाही’चे पाच हजार अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकरी वैतागला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता कोरपना तहसील कार्यालयावर शेतकºया धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या मोहिमेर्तगत शेतकºयांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भरून घेतलेले ५ हजार अर्ज तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे देण्यात आले.
यावेळी माजी आमदार सुभाष धोटे शेतकºयांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, शोषित, पीडितांना फक्त आश्वासनाचे गाजर देत असून त्यापलिकडे काहीच दिले नाही. शेतकºयांची कर्जमाफी केली म्हणून शासन गाजावाजा करीत आहे. मात्र प्रत्यक्षात किती शेतकºयांची कर्जमाफी झाली असा सवाल त्यांनी शासनाला केला. सरकार हे फसणवीस सरकार असून शासनाने दुर्गम व आदिवासी भागातील शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आॅनलाईन अर्ज भरणे आदिवासी भागातील शेतकºयांना शक्य होत नाही आहे. अनेक ठिकाणी इंटरनेटची व्यवस्था नाही. वेगवेगळ्या जटील अटी व शर्ती लादून कर्जमाफी केली आहे म्हणणाºया शासनाला धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यात ज्या शेतकºयांची कर्जमाफी झाली नाही अशांकडून ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ म्हणून अर्ज भरून घेतले आहे, असे सांगितले. मोर्चात तालुकाध्यक्ष विठ्ठल थिपे, विजय बावणे, सभापती शाम रणदिवे, उपसभापती संभाशिव कोवे, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, विनाताई मालेकर, कल्पना पेचे, उत्तम पेचे, सिताराम कोडापे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, महासचिव विक्रम येरणे, सतीश बेतावर, उमेश राजूरकर, महिलाध्यक्ष ललिता गेडाम, रऊफ खान, वजीर खान आदी सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. विकृत विचारसरणी असलेल्या लोकांकडूनच अशी अपेक्षा करता येते. ७० वर्षांच्या काळात काँग्रेसकडून भाजपच्या नेतृत्वाला अशाप्रकारच्या घटनांना सामोरे जाण्याची वेळ आली नव्हती. काँग्रेसने संस्कृती जपली. मात्र अल्पावधीत भाजपच्या लोकांची वृत्ती तानाशाही झाल्याचे सांगत या घटनेचा सुभाष धोटे यांनी निषेध केला.
 

Web Title: The front of farmers' front was shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.