वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:11 AM2017-11-17T01:11:20+5:302017-11-17T01:13:48+5:30
रानटी डुकरांचा बंदोबस्त करा. नाहीतर शेतकºयांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : रानटी डुकरांचा बंदोबस्त करा. नाहीतर शेतकºयांना रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या, यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात येथील वनपरिक्षेत्र कार्यालयावर शेतकºयांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा गुरुवारी दुपारी काढण्यात आला. रानटी डुकरापासून होणाºया नुकसानीची भरपाई द्यावी, सरपणासाठी लाकूड उपलब्ध करुन द्यावे, रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा, बांबू कारागिरांना हिरवा बांबू उपलब्ध करून देण्यात यावा, शेतकºयांना विनामुल्य सौरकुंपन देण्यात यावे, आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आला. सावली तालुक्यातील जंगलालगतचे शेकडोच्या संखेने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा महात्मा जोतिबा फुले चौक ते वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयापर्यंत निघाले. विजय सिध्दावार यांनी शेतकºयांची परिस्थिती अधीकाºयांपूढे मांडली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी जी. व्ही. धाडे यांना निवेदन देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी यावेळी मागण्यांवर सखोल चर्चा करीत याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष रामचंद्र हुलके, माजी महासचिव व केंद्रीय कमिटी सदस्य विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, यात्रिका कुमरे यांचे भाषण झाले. यावेळी तालुका सचिव अनिल मडावी, महासचिव छाया सिडाम, अमर कड्याम, फरजाना शेख, विशाल नर्मलवार, रेषमा गेडाम व तालुक्यातील कार्यकर्ते व शेकडो शेतकरी उपस्थित होते.