रेल्वे उड्डाण पुलासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:17 PM2018-09-07T23:17:13+5:302018-09-07T23:17:34+5:30
शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: शहरातील वस्ती व डेपो विभागातील नागरिकांना रहदारीसाठी रेल्वे उड्डाण पूल तयार करण्यात आला. पण हा पूल जिर्ण झाल्यामुळे धोका वाढला. रेल्वे व नगरपरिषद प्रशासनाने संयुक्त निधीतून पूलाची दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
रेल्वे पुलाचे मागील एक वर्षापासून सुरू आहे. पण बांधकामात दिरंगाई होत असल्याने रेल्वे लाईन ओलांडताना चार अपघात झाले. एका विद्यार्थ्यांचा मृत्यू तर तिघे कायमचे अपंग झाल्याची घटना घडली. नवीन आराखड्यानुसार पुलाचे बांधणी करण्यात येत आहे. पण महिला, विद्यार्थी व नागरिकांकरिता हा पूल सुरक्षित नाही. त्यामुळे जुन्या आराखड्यानुसार बांधकाम करण्याची मागणी शहर विकास आघाडी, युथ फोर्स, महाराष्टÑ नवनिर्माण सेना व विविध सामाजिक संघटनेने केली. मोर्चाचे नेतृत्व भारत थुलकर, विष्णू बुजोणे, प्रशांत गद्दाला यांनी केले. मोर्चाची सुरूवात महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. याप्रसंगी विष्णू बुजोणे, आशा भाले, रेखा मेश्राम, चंदा डुंबरे यांनी विचार मांडले.