श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Published: January 26, 2017 01:26 AM2017-01-26T01:26:29+5:302017-01-26T01:26:29+5:30

गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल

Front of SDO office of the Labor Elgar Association | श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

श्रमिक एल्गार संघटनेचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

Next

एकास अटक : दोन दिवसांची पोलीस कोठडी
मूल : गरिबांना वेळेवर धान्याचे वाटप करावे व वनजमिनी नियमानुकूल करावे या मागणीसाठी मूल व सावली तालुका श्रमिक एल्गारच्या वतीने मूल उपविभागीय कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दोन्ही तालुक्यातील हजारो महिला-पुरूष सहभागी झाले होते.
सरकारचे धोरण गरीब विरोधी असून त्याविरोधात श्रमिक एल्गारचा लढा सतत सुरू राहील, असा निर्धार संघटनेच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केला. त्या मोर्चाला संबोधीत करताना बोलत होत्या. जिल्ह्यातील अनेक एपीएल कुटूंबात कुपोषीत मुले असल्याने कुपोषण मुक्तीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहीजे, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
उपविभागीय अधिकारी उपस्थित नसल्याने मूलचे तहसिलदार सरवदे व सावलीचे तहसिलदार भोयर यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, श्रमिक एल्गारचे कार्यकर्ते विजय कोरेवार, महासचिव घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, अनिल मडावी, संगीता गेडाम, रवी शेरकी, रामचंद्र हुलके, यात्रीका कुमरे, मिराबाई पेटकुले यांची भाषणे झालीत.
सभेचे संचालन मूल तालुका सचिव दिनेश घाटे यांनी तर आभार किरण शेंडे यांनी मानले. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी फरजाना शेख, सपना कामडी, वंदना मांदाडे, अनिल शेंडे, अमित राऊत, प्रेमदास उईके, बाळू मडावी, अरूण जराते, वच्छलाबाई लटारे, दौलत शेंडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

या आहेत मागण्या
एपीएल कार्डधारकांना रेशन मिळाले पाहिजे, धान्यात वाढ झाली पाहीजे, कुपोषण मुक्तीसाठी प्रत्येक कुटूंबाला धान्य द्यावे, प्रत्येक कुटूंबाला किमान दोन लिटर रॉकेल द्यावे, वनजमिनीसाठी गैरआदिवासी करीता लावलेली तीन पिढ्याची अट रद्द करावी, पट्टे देण्यासाठी ग्रामसभेची पन्नास टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, या मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.

 

Web Title: Front of SDO office of the Labor Elgar Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.