ट्रॅक्टर चालक-मालकांचा मूलमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 11:16 PM2018-02-26T23:16:03+5:302018-02-26T23:16:19+5:30

गौण खनिजांच्या उत्खननाबाबत महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी रोजी काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यासंदर्भात जय बजरंग ट्रॅक्टर व ट्रक चालक-मालक संघटनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी शेकडो ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढण्यात आला.

Front of tractor driver-owners | ट्रॅक्टर चालक-मालकांचा मूलमध्ये मोर्चा

ट्रॅक्टर चालक-मालकांचा मूलमध्ये मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देनिवेदन सादर : शेकडो ट्रॅक्टर घेऊन चालक सहभागी

आॅनलाईन लोकमत
मूल : गौण खनिजांच्या उत्खननाबाबत महाराष्ट्र शासनाने १२ जानेवारी रोजी काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा, यासह विविध मागण्यासंदर्भात जय बजरंग ट्रॅक्टर व ट्रक चालक-मालक संघटनेच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सोमवारी शेकडो ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
चामोर्शी नाक्यापासून निघालेला मोर्चा दुपारी १ वाजता उपविभागीय कार्यालयासमोर पोहचला. मोर्चाचे नेतृत्व जय बजरंग ट्रॅक्टर व ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हसन वाढई, किरण पोरेड्डीवार यांनी केले. मोर्चात शेकडो ट्रॅक्टर घेऊन आलेल्या मोर्चेकऱ्यांनी शासनाविरूध्द विविध घोषणा दिल्या. यावेळी शासनाने काढलेल्या अध्यादेशामुळे ट्रॅक्टर व ट्रक मालकांना बेरोजगार करण्यात आलेले आहे. या व्यवसायावर जीवन जगणाºया मजुरांनाही उपासमारीचा सामना करावा लागत आहे. शासनाने तत्काळ स्वामीत्वधनाच्या रकमेत रॉयल्टी उपलब्ध करून देण्यात यावी, रॉयल्टी शासनामार्फतच मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात यावी, लिलावात गेलेले रेती घाट कंत्राटदार बाहेर जिल्ह्यात रेतीचा पुरवठा करतात, त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांना ५० टक्के रॉयल्टी देणे बंधनकारक करण्यात यावे, हाताला काम मिळावे म्हणून सुशिक्षित बेरोजगार बॅकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर घेऊन व्यवसाय करीत होते. मात्र शासन निर्णयामुळे त्यांच्यावर परत बेरोजगारीची पाळी आलेली आहे. यामुळे हा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा आदी मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.
याप्रसंगी जय बजरंग ट्रॅक्टर व ट्रक चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष हसन वाढई, सामाजिक कार्यकर्ते टिंकू गांगरेड्डीवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वल्केवार यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात पुरूषोत्तम वासेकर, दत्तात्रय समर्थ, अमोल लोहकरे, नरेश मूरसकर, चंद्रकांत चटारे, जुबेद शेख, प्रदीप कामडे, आतिश वाळके, सचीन अगडे, दीपक चुगानी, सत्यवान गेडाम यांच्यासह शेकडो जण सहभागी झाले होते.

Web Title: Front of tractor driver-owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.