आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:45 PM2018-07-20T22:45:45+5:302018-07-20T22:46:17+5:30
वसतिगृहातील विद्यार्थी व गोंडवाणा गणतंत्र पार्टी तसेच इतर संघटनांनी ६ एप्रिलच्या शासन निर्णय (डीबीटी) योजनाच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: वसतिगृहातील विद्यार्थी व गोंडवाणा गणतंत्र पार्टी तसेच इतर संघटनांनी ६ एप्रिलच्या शासन निर्णय (डीबीटी) योजनाच्या विरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याची योजना शासनाने सुरु केली. या योजनेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.अशा योजना शासनाने बंद कराव्यात आणि पूर्वीची भोजन पद्धत सुरु ठेवावी. तीन महिन्यात विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. परंतु कमी वयोगटातील विद्यार्थ्यांना हा व्यवहार करता येणार नाही. खात्यात पैसे जमा झालेले विद्यार्थी आपल्या सोयीनुसार जेवणाची सोय करु शकतात. परंतु विद्यार्थी आपले वसतिगृह सोडून रात्री जेवणासाठी बाहेर जाणार का, असा सवाल विद्यार्थी व विविध संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी सरकारला निवेदनाद्वारे विचारला आहे.