गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:49 PM2019-03-06T22:49:44+5:302019-03-06T22:51:36+5:30

गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Functions of Gosikhurd distributors | गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

गोसीखुर्द वितरिकांची कामे मंदावली

Next
ठळक मुद्देटेंडर होऊनही कामास विलंब : सिंचनासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवरा : गोसेखुर्द उजव्या मुख्य कालव्यावरील उपकालवा बी पाचचे काम जनकापूर ते विहीरगाव शिवारात मागील चार वर्षांपासून थंडावले असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागल आहे. त्यामुळे सदर काम त्वरित करून सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जनकापूर ते विहीरगाव शेत सर्व्हे क्र. २०० पर्यंत गेल्या चार वर्षापूर्वीपासून बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकºयांच्या खरीप पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. कालव्याचे बांधकाम झाले नसल्याने या परिसरातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून लोकवर्गणी व स्थानिक आमदारांच्या सहयोगातून अर्धवट राहिलेल्या उपकालव्याचा आधार घेत पाणी घेऊन शेतातील पीक वाचवित आहेत. विशेष म्हणजे, धानपिक जगविण्यासाठी पाणी दिल्यास संबधित विभागाला पाण्याचे मागणी बील सुद्धा देण्याचे शेतकºयांनी मान्य केले आहे. असे असले तरी हक्काचे पाणी शेतकºयांना अद्यापही मिळालेले नाही.
विहिरगाव, कसरगाव, गेवराखुर्द, मंगरमेंढा या परिसरातील शेतकरी गोसेखुर्दच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. संबंधित गोसीखुर्द प्राधिकरणाकडून सावली तालुक्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात उपकालवे व वितरीकेचे कामे प्रगतीवर आहेत. मात्र गेवरा परिसरातील १० ते १५ गावात अद्यापपर्यंत कुठल्याही स्वरुपात बांधकामांचा अंदाज नसल्याने शेतकºयांकडून संबंधित विभागाला सातत्याने विचारणा केली जात आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
यासंदर्भात संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून माहिती घेतली असता, जनकापूर ते विहिरगाव दरम्यान बी पाच सर्व्हे क्र. २०० च्या पुढील कामे बंद पाईप लाईनद्वारे कामे केले जाणार आहे. त्याबाबत कार्य करणाºया यंत्रणेला निवीदा मंजूर करण्यात आल्या.
सदर कंपनीकडून कामाचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक डिझाईन व नियोजन प्रक्रियेनंतर पुढील कामे करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी या भागात सिंचनाची व्यवस्था चिंतेची बाब आहे.
याभागात आजतागायत कुठलीही कायमस्वरुपी ठोस सिंचन व्यवस्था नसल्याने दरवर्षी या भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाला बळी ठरत आहे. त्यामुळे येथील उपकालव्याचे काम त्वरित करून संकटात सापडलेल्या शेतकºयांनी दिलासा देण्याची मागणी आता जोर धरत आहे.
शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित
एकेरी पीक पद्धतीत अडकलेल्या या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधेने दुबार पिके घेता येऊ शकते. मात्र यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत पुढील कामांच्या अनुषंगाने प्रशासनाकडून काहीच हालचाल दिसत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील अन्य भागात सुरु असलेल्या वितरीका आणि उपकालवे बांधकामाच्या प्रगतीवरुन या भागातील प्रत्येक गावातून शेतकरी चिंतेत असून काम त्वरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Functions of Gosikhurd distributors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.